Homeसांस्कृतिक'सूर विश्वास' मध्ये रविवारी शिवाली चंद्रशेखर यांचे शास्त्रीय गायन

‘सूर विश्वास’ मध्ये रविवारी शिवाली चंद्रशेखर यांचे शास्त्रीय गायन

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. १३) सकाळी सात वाजता शिवाली चंद्रशेखर (लॉस एंजेलिस, अमेरिका) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना रसिक कुलकर्णी (तबला), दिव्या रानडे(संवादिनी) यांची साथसंगत लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे या करणार आहेत.

मैफिलीचे हे ५२ वे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ‘सूर विश्वास’ मध्ये उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.

कला, संगीताला देशाच्या रसिकांच्या सीमा नसतात, त्या व्यापक अनुभूती व आनंद देत असते. याची प्रचिती शिवाली चंद्रशेखर यांच्या संगीत प्रवासाकडे पाहून येते. लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड होती आणि त्या ध्यासातूनच त्यांनी संगीत सेवेस सुरूवात केली. घरातूनच त्यांना गायनाचा संगीताचा वारसा मिळाला. लहानपणापासूनच आई सौ. कामिनी चंद्रशेखर यांच्याकडून त्यांनी गायनाचे प्राथमिक धडे घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक अरूण द्रविड यांच्याकडे शास्त्रशुद्ध गायकीचे शिक्षण घेतले. गायनातील शैली, परंपरा यांचाही त्यांना वेध घेता आला, अभ्यास करता आला. सध्या त्या प्रसिद्ध गायक डॉ. आशिष रानडे (नाशिक) यांचेकडे गेली पाच वर्षे किराणा घराण्याच्या गायकीचे ऑनलाईन आणि ऑफ लाईन शिक्षण घेत आहेत. डॉ. आशिष रानडे यांच्या अभ्यासू, प्रयोगशील गायनशैलीचा त्यांच्या संगीत सेवेच्या वाटचालीत निश्‍चितच उपयोग होईल. ही त्यांच्या कला साधनेची निष्ठा म्हणावी लागेल. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!