Homeराजकीयभाजपातील वाढत्या अंतर्गत विरोधामुळे बडगुजर यांची राजकीय कोंडी

भाजपातील वाढत्या अंतर्गत विरोधामुळे बडगुजर यांची राजकीय कोंडी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेश देऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीतील निष्ठावंत एकवटले आहेत. शिवसेनेतील हकालपट्टीमुळे ‘बार्गेनिंग पॉवर’ गमावलेल्या बडगुजर यांचा ऐनकेन प्रकारे भाजपा प्रवेश झाला तरीही तिथे त्यांना अनेक राजकीय आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे बडगुजर यांची सध्या तरी राजकीय कोंडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेत सत्ता व संघटनेत सर्वच मानाची पदे आणि संधी उपभोगणाऱ्या बडगुजर यांना राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या वळचणीला जाण्याचे स्वप्न पडू लागले. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून त्यांनी शिवसेनेच्या जिल्हास्तरावर झालेल्या संघटनात्मक बदलाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपा ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाल्याचे कळताच बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला. नाशिक शिवसेनेत बडगुजर म्हणतील ती पूर्व दिशा, असे चित्र असतानाही बडगुजर यांचा पक्षबदलाचा निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाला दुखावणारा ठरला. त्यामुळेच त्यांना राजीनामा देण्याची संधी न देता थेट हकालपट्टी करत भाजपातील बडगुजर यांच्या राजकीय ‘बार्गेनिंग’ मधील हवा काढून घेण्यात आली.

दुसरीकडे बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्यासाठी पक्षांतर्गत विरोध सुरु झाला. विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी असणाऱ्या आमदार सीमा हिरे यांनी या विरोधाला वाचा फोडत बडगुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण, मुलावरील गुन्हेगारी स्वरूपांचे आरोप, महापालिकेतील ठेकेदारी, भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांवर केलेले गंभीर आरोप यांची आरोपांची जंत्रीच वरीष्ठांकडे सादर केली. बडगुजर पक्षात आल्यास सत्तेतील महत्वाच्या पदांची संधी हुकेल, या भितीने नाशिक पश्चिम मतदार संघातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आ. हिरे यांच्या पाठीशी एकवटले. एवढेच नव्हे तर रा. स्व. संघाच्या वर्तृळातूनही बडगुजर यांना विरोध होत आहे. त्यामुळे आता बडगुजर यांची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटातून विरोध केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला ‘जय श्रीराम’ करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते यांनी निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर गिते पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. मात्र पंचवटी परिसरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध दर्शवला असून त्यांच्या कथित भुसंपादन घोटाळ्याची माहितीही वरीष्ठांना देण्यात आली आहे. त्यामुळे बडगुजर यांच्याप्रमाणेच गिते यांच्या पक्षप्रवेशाला अपशकून करण्यात आला आहे. आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!