नाशिक – विशेष प्रतिनिधी
रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अँण्ड कल्चलर आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जी. एच. रायसोनी मेमोरियल नाशिक जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचा अंतिम सामने व बक्षीस वितरण समारंभ संघटनेचे अध्यक्ष राधेशाम मुंदडा, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील तसेच आशिष वट्टेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे सचिव पराग एकांडे, योगेश एकबोटे व अनंत जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संघटनेचे अध्यक्ष राधेशाम मुंदडा यांच्या शुभहस्ते खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करतांना पराजय झालेल्या खेळाडूंनी खचून न जाता आपल्या सरावात वाढ करून नियमितपणा ठेवावा तसेच येणाऱ्या नवीन पिढीच्या दृष्टीने खेळाचे जीवनातले महत्त्व किती आहे हे समजावून सांगितले. खेळामुळे मुलांची आकलन शक्ती वाढते तसेच मुलांच्या अंगी शिस्तप्रियता तयार होते. त्यामुळे मुलांनी लहानपणापासून खेळात सहभागी व्हावे आणि त्यासाठी पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असे सुचविले.
११ वर्षांखालील मुलांच्या वयोगटामध्ये अंतिम सामना सुजय राजपुते याने अकमल रंगवाला याचा २१-१४, २१-१२ असा पराभव केला. अतिशय उत्कृष्ट प्रदशर्न या दोन खेळाडूंनी केले. १३ वर्षांखालील मुलींच्या वयोगटामध्ये अंतिम सामना जुई राजगुरू व कारवी कुलकर्णी यांच्या मध्ये झाला. प्रदीर्घ रॅली जोरदार स्मॅश व ड्रॉप च्या जोरावर जुई राजगुरू हिने हा अंतिम सामना २१-१६, २१-१७ असा जिंकून अजिंक्यपद मिळविले. पुरुष दुहेरी अंतिम सामना अमेय खोंड व विनायक दंडवते यांनी जोरदार स्मॅश, ड्रॉप, टॉस मारून आदित्य म्हात्रे व अमित देशपांडे यांचा २१-१६, २१-१८ असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संघटनेचे अध्यक्ष राधेशाम मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रिया जोशी यांनी केले. या प्रसंगी संघटनेचे सचिव पराग एकांडे, योगेश एकबोटे, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील व आशिष वट्टेवार, अनंत जोशी आदि मान्यवर, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे :-
११ वर्षाखालील मुले
उपविजेता :अकमार रंगवाला, विजेता :- सावज्ञ राजपुत
११ वर्षाखालील मुली
उपविजेती :- सुमेधा मोरे विजेती :- कैरवी कुलकर्णी
१३ वर्षाखालील मुले
उपविजेता :- यश अग्रवाल, विजेता : योहान कल्याणी
१३ वर्षाखालील मुली
उपविजेती :- सुमेधा मोरे विजेती :- कैरवी कुलकर्णी
१५ वर्षाखालील मुले
उपविजेता :- मार्गशिर्ष आव्हाड, विजेता : बेनेट बिजू
१५ वर्षाखालील मुली
उपविजेती :- जुई राजगुरू, विजेती :- अधिरा चौहान
१७ वर्षाखालील मुले
उपविजेता :- स्वराज भामरे, विजेता : ईशान वानखेडे
१७ वर्षाखालील मुली
उपविजेती :- आकांशा घोडके, विजेती :- अधिरा चौहान
१९ वर्षाखालील मुले
उपविजेता :- सोहम हिंगणे , विजेता : स्वराज भामरे
१९ वर्षाखालील मुली
उपविजेती :- श्रावणी पाटील, विजेती :- हिता अग्रवाल
१९ वर्षाखालील मुले दुहेरी
उपविजेते :- सोहम हिंगणे व स्वराज भामरे , विजेते : मानस ठाकरे व सिद्धेश दुर्गपुरोहित
पुरुष एकेरी
उपविजेता :- ईशान वानखेडे , विजेता : स्वराज भामरे
महिला एकेरी
विजेती :- हेतल विश्वकर्मा
पुरुष दुहेरी
उपविजेते :- आदित्य म्हात्रे व अमित देशपांडे , विजेते :- विनायक दंडवते व अमेय खोंड
३० वर्षावरील महिला दुहेरी
उपविजेती :- हर्षदा एकांडे व रोहिणी सवई , विजेती :- ऋतुजा ढिकले व स्नेहल कोहक
३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
उपविजेते :- आशिष तोरणे व कौस्तुभ पवार, विजेते :- चंदन जाधव व विक्रांत करंजकर
४५ वर्षावरील पुरुष दुहेरी
उपविजेते :- महेश बालानी व श्रीकांत सृष्टी, विजेते :- भ्रमर सागर व दिनेश अडसरे
५० वर्षावरील पुरुष दुहेरी
उपविजेते :- अनंत जोशी व श्रीकांत सृष्टी, विजेते :- अमोल सावरकर व भ्रमर सागर

























