नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.२७ जुलै) संपूर्ण नाशिक जिल्ह्यात भगवा सप्ताहा साजरा करण्यात येणार आहे. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी योगदान द्यावे असे आवाहन उपनेते दत्ताजी गायकवाड यांनी केले.
लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवशीय नाशिक दौऱ्यावर येत आहे.त्याच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी व त्यांच्या वाढदिवसाची रुपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.१५) शिवसेना नाशिक जिल्हा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाच्या शालिमार चौक येथील जिल्हा मंध्यवर्ती कार्यालयात येथे जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी दत्ता गायकवाड बोलत होते.
यावेळी बाेलताना खा. राजाभाऊ वाजे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हा दौरा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन केले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख जयंत दिंडे, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी, माजी आमदार वंसत गिते यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. बैठकी प्रसंगी उपस्थित मान्यवराच्या हस्ते महिला आघाडीच्या नवनियुक्त संघटक स्वाती पाटील, जिल्हा समन्वयक कीर्ती जावखेडकर, कीर्ती निरगुडे, उपजिल्हा संघटक शोभा दिवे, फैमिदा रंगरेज, शोभा दोंदे, विधानसभा संघटक उषा गायके, प्रेमलता जुन्नरे, अलका गायकवाड, महानगर संघटक शोभा वालडे, सुवर्ण काळूगे, माधुरी जाधव, मनीषा जाधव, सीमा बडदे, शोभा पवार, विधानसभा समन्वयक चित्रा ढिकले, तृप्ती बोरसे, वृषाली सोनवणे, महानगर समन्वयक रंजना थोरवे, लता काची, द्वारका गोसावी, उपमहागर संघटक संगीता महाले, माधुरी पाटील, शारदा सपकाळ, सिंधू पगार, मोहिनी राव, शोभा दळवी, मंदा गवळी, अनिता महाले यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीस शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गिते, माजी महापौर यतिन वाघ, कोअर कमिटी सदस्या भारतीताई ताजनपुरे, उप जिल्हाप्रमुख जगनराव आगळे, महेश बडवे, भैय्या मणियार, कुलदिप चौधरी, निवृती जगताप, सतिष देशमुख, दिलीप मोरे, जिल्हा सचिव मसुद जिलानी, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, राहूल दराडे, सुभाष गायधनी, युवासेना विस्तारक प्रविण चव्हाण, सुनिल जाधव, ऋर्षी वर्मा, नंदू वराडे, प्रमोद मोजाड, सुनिल जाधव, तालुकाप्रमुख राजु नाठे, मोहन गांगुर्डे, विलास भवर, डॉ. प्रशांत सोनवणे, शिवा सुराशे, संजय धाकराव, ज्ञानेश्वर गाडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

























