Homeक्राईमव्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी; हद्दपार सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद

व्यापाऱ्यांकडून पैशांची मागणी; हद्दपार सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद

पंचवटी – प्रतिनिधी
खून व दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार किरण सुखलाल केवर (वय २५, धंदा केटरींग, रा. फ्लॅट नंबर १०१, चामुंडा ग्रीन अपार्टमेंट, शांतीनगर, गॅस गोडावुन समोर, मखमलाबाद) यास खंडणी विरोधी पथकाने पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. शस्त्राचा धाक दाखवून दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहीती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी पथकातील हवालदार दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांना किरण केवर हा हद्दपार असूनही पिस्तूल हातात उघडपणे घेवून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहीती मिळालेली होती. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पथकाने मखमलाबाद येथील श्री. तिरूमाला गुलमोहर बिल्डींग जवळील आवजीनाथ टी स्टॉल येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, भगवान जाधव व भरत राऊत यांनी ही कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!