Homeधार्मिकराष्ट्र,धर्म आणि संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

राष्ट्र,धर्म आणि संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

नाशिक – विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने राष्ट्र,धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे असे स्पष्ट प्रतिपादन सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट करून गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.

सेवामार्गातर्फे राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय हवनयुक्त नवनाथ पारायणामध्ये ३५५१ सेवेकरी आणि एक दिवसीय गुरुचरित्र पारायणामध्ये ११२१ सेवेकर्‍यांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित केली. शनिवारी (१६ऑगस्ट) परमपूज्य गुरुमाऊलींचा साप्ताहिक सत्संग झाला. आपल्या हितगुजामध्ये गुरुमाऊलींनी वरील दोन्ही शक्तिशाली सेवांचा उल्लेख करून या सेवा राष्ट्रासाठी समर्पित करण्यात आल्या आहेत असे जाहीर केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती प्रमाणेच सेवामार्गातर्फे मातृ ,पितृ ,अतिथी देवो प्रमाणेच राष्ट्र देवो भव ही शिकवण रुजवली जाते. राष्ट्र ,धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात असे त्यांनी स्पष्ट केले.

बारा लक्ष जप लिहिण्याचे आवाहन

सेवेकर्‍यांनी फावल्या वेळेत संस्कार वहीमध्ये दत्त जयंतीपर्यंत बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहावा. या वह्या गाणगापूर दत्तपिठावर होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या मासिक सत्संगाला जमा कराव्यात,त्याचबरोबर सध्या श्रावण महिन्यात भगवान शिवाची जास्तीत जास्त सेवा रुजू करावी आणि व्यास महर्षींनी भगवान गणेशाकडून श्रीमद् भागवत ग्रंथाचे लेखन केल्यामुळे गणपती पंधरवड्यामध्ये श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण करावे, शारदीय नवरात्रोत्सवात श्री दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ करावेत असे आवाहन गुरुमाऊलींनी केले.

दादासाहेब, नितीनभाऊ यांचे मार्गदर्शन

गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे आणि गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी नवनाथ आणि गुरुचरित्र पारायण करणाऱ्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. गोपाळकाला आणि नवनाथ भक्तीचे महत्त्व श्री चंद्रकांत मोरे यांनी सांगितले तर त्र्यंबक नगरीचे आणि गुरुपीठात होणाऱ्या सेवेचे महत्त्व श्री. नितीन मोरे यांनी नमूद केले.

सेवामार्गाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन

सेवामार्गाच्या श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका २०२६ चे प्रकाशन परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सण,वार व्रत,वैकल्ये याबरोबरच लक्ष्मीपूजनाची मांडणीसह माहिती, राहू काळ, वेगवेगळ्या शास्त्रांसह मूल्यसंस्कार, गर्भसंस्कार, विवाह संस्कार आदी विषयांची अत्यंत उपयुक्त माहिती २०२६ च्या मार्गदर्शिकेत समाविष्ट आहे. स्वच्छ, सुंदर,छपाईसह परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद या मार्गदर्शिकेला लाभला आहे. ज्या घरामध्ये ही मार्गदर्शिका असते तिथे संस्कृती नांदते असे गुरुमाऊली नेहमी आवर्जून सांगत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!