Homeक्रीडाडॉ. सुमित सिंह पदम यांचे नादमधुर सतारवादन; राग, लय अन् भावनांची...

डॉ. सुमित सिंह पदम यांचे नादमधुर सतारवादन; राग, लय अन् भावनांची रंगली अनोखी मैफल

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सतारीवर फिरणाऱ्या लयदार बोटांतून उमटणारा मधुर नाद, त्यातली गहिरी लयकारी आणि भावस्पर्शी स्वरांची झंकार यांचा अविस्मरणीय अनुभव नाशिकच्या रसिकांना लाभला. नव्या पिढीतील गुणी कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या उपक्रमांतर्गत आयोजित ५३ व्या पुष्पाच्या रूपाने ही मैफल रंगली. त्यात अमृतसर (पंजाब) येथील तरुण आणि प्रतिभावान कलाकार डॉ. सुमित सिंह पदम यांच्या सुरेल सतारवादनाने कार्यक्रमास रंगत आली. त्यांना रसिक कुलकर्णी (तबला) यांची सुंदर साथसंगत लाभली. मैफलीचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.

विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर यांच्या पुढाकाराने व विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरूवात झाली असून, कार्यक्रमाचे आयोजन विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.

डॉ. सुमित सिंह यांनी संगीत मैफलीची सुरुवात सकाळच्या प्रहरातील राग अहिर भैरव या गंभीर आणि माधुर्यपूर्ण रागाने झाली. या रागातील आलाप-तानांनी प्रेक्षकांना सकाळच्या शांत, प्रसन्न वातावरणाची अनुभूती दिली. त्यानंतर पावसाळी वातावरणाशी सुसंगत असा राग मियां मल्हार सादर करण्यात आला. या रागातील मनमोहक बंदिशींनी उपस्थित रसिकांना पावसाच्या सरींप्रमाणे ताजेतवाने केले. 

कार्यक्रमाची सांगता भक्तिरसाने ओथंबलेल्या सुंदर भजनांच्या सादरीकरणाने झाली. भजनातील भावस्पर्शी गायनामुळे रसिकांना अध्यात्मिक समाधान आणि संगीताचा परिपूर्ण आनंद लाभला.
कार्यक्रमानिमित्त कलावंतांचा सत्कार डॉ. मनोज शिंपी, स्वाती शहा, ज्ञानेश्वर कासार, डॉ. श्रद्धा वाळवेकर व ऋचिता ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच तबलावादक अथर्व नितीन वारे व सतारवादक रवी थोरात यांचाही सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!