Homeक्राईमनाशिकरोडमधील कुख्यात यादव-पाईकराव टोळीविरुद्ध 'मकोका' अन्वये कारवाई

नाशिकरोडमधील कुख्यात यादव-पाईकराव टोळीविरुद्ध ‘मकोका’ अन्वये कारवाई

नाशिकरोड । विशेष प्रतिनिधी
नाशिकरोडमधील कुख्यात गुन्हेगार बबलू यादव व
टोनू पाईकराव यांच्या टोळीविरुद्ध शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अर्थात ‘मकोका’ अन्वये कारवाई केली आहे. या टोळीत एकूण १३ आरोपींचा समावेश असून त्यातील दोन अल्पवयीन आहेत.

या गुन्हेगारांनी टोळी निर्माण करून एकटयाने किंवा संघटीतरित्या हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाक दपटशा दाखवून आर्थिक फायदयासाठी तसेच परिसरात टोळीचे वर्चस्व कायम राहण्याकरीता खून, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी, दुखापत, गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, गैर निरोध करणे, गृह अतिक्रमण, इच्छापुर्वक दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धाकदपटशा करणे, नुकसान करून आगळीक करणे आदी गुन्हे केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘मकोका’ अन्वये कारवाई केली आहे.

या टोळीचा म्होरक्या बबलु रामधर यादव (२७, रा. सुंदरनगर, देवळाली गाव) याच्यासह हर्ष सुरेश म्हस्के उर्फ टोनु पाईकराव (२३), धनंजय सुरेश म्हस्के (१९), मयुर अनिल जानराव (२२), तुषार रविंद्र सावंत (२५), ऋषिकेश शिवाजी पवार (२१ वर्षे), अभिनव उर्फ अवि नंददिप जाधव (२०), प्रथमेश उर्फ मोटया नेल्सन कसबे (२५), दानिश हबीब शेख (१९), सन्या तसेच विराज गुलाब कांबळे (२७) व दोन अल्पवयीन अशांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ कलम ३(१) (ए), ३(२), ३(४) ही वाढीव कलमे लावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त संगिता निकम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

—————————————————-

शहरातील जे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासुन परावृत्त होणार नाहीत त्यांच्यावर मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कायदयान्वये प्रभारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

– संदिप कर्णिक,
पोलीस आयुक्त, नाशिक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!