Homeक्राईम'भारत पेट्रोलियम' ची पाईपलाईन फोडून इंधनाची चोरी; पाच जणांना अटक

‘भारत पेट्रोलियम’ ची पाईपलाईन फोडून इंधनाची चोरी; पाच जणांना अटक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नांदगाव नजिकच्या अनकवाडे शिवारात असलेल्या ‘बीपीसीएल’ च्या मुंबई- मनमाड-बिजवासन पाईपलाईनला छिद्र पाडून पेट्रोल डिझेलची चोरी करण्याचा धाडसी प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून टोळीची उकल केली असून पाच जणांना अटक केली आहे. उर्वरीत तिघा आरोपींचा शोध सुरु आहे. पाईपलाईनमधून किती इंधन चोरीला गेले, त्याचा अत्यंत बारकाईने तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल उर्फ सोनु जयशंकर तिवारी (वय ३५, रा. काका ढाब्याजवळ, कल्याण), कथुरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, गौतम नगर, गोवंडी, मुंबई), मोहम्मद मकसूद अब्दुल वाहीद शेख (वय ४०, रा. मदरसा स्कुल, रुम नं. ८-२० संजय नगर भाग-२, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई), इरफान याकुब मोमीन (रा. इंडीयन हायस्कुल जवळ, जमधाडे चौक, मनमाड), काकासाहेब शिवराम गरुड (रा. अनकवाडे, ता. नांदगाव) यांना अटक करण्यात आली असून वाहीद सदार सैय्यद (रा. नटवर पारखे कंपाऊन्ड, बिल्डींग नं. १०/A, रुम नं. ७१०, घाटकोपर लिंग रोड, इंडीयन ऑईल नगर, गोवंडी मुंबई), याकुब शेख व अमजद कुरेशी (रा. मुंबई) यांचा शोध सुरु आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, अनकवाडे शिवारात (ता. नांदगाव) येथे मुंबई- मनमाड-बिजवासन पाईपलाईन चैनेज (सी.एच) २४३.३०० किमी. जवळ लबाडीचे इराद्याने पेट्रोल डिझेलची चोरी करुन विक्री करण्याचे उद्देशाने पाईप लाईनला क्लॅम्प बसवुन छिद्र केल्याबाबतचा प्रकार सहा मे रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी बी.पी.सी.एल. इन्टॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी दिलेल्या तक्रारी वरुन मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०२ (२), ६१(२) पेट्रोलियम आणि खनिज वाहक नळ (जमीन वापरणाऱ्याचे हक्क संपादन करणे) अधिनियम १९६२ चे कलम १५, १६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा व क्लिष्ट असल्याने मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी विशेष पथक स्थापन करून तपासास प्रारंभ केला. तपासाचे कौशल्य वापरून यातील टोळीची उकल करण्यात आली मुंबई – मनमाड – बिजवासन पेट्रोलियम पाईप लाईनला छिद्र करुन क्लॅम्प व जी.आय. पाईप व्हॉल्वसह बसवुन नेमके किती पेट्रोलियम पदार्थ चोरी करण्यात आला. व कोणास विकला तसेच कोणत्या टँकरमधुन वाहतूक केले तसेच आणखीन किती ठिकाणी अशाच प्रकारे चोरी करण्यात आली आहे, याबाबत अधिकचा तपास सुरु आहे.

नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक, तेघबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मा. करे, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक कौशल रामनिरंजन वाघ, हवालदारा राजेंद्र केदारे, पंकज देवकाते, प्रल्हाद सानप, अशोक व्यापारे, संदीप झाल्टे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरणार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदिप बहीरम यांनी विशेष कामगिरी करुन गुन्ह्याची उकल केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!