– धर्मांतरीत स्थानिकासह चौघांविरुद्ध गुन्हा…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांसह चौघांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यातील चौथा संशयित मुळचा नाशिकचा असून त्याने बांगलादेश मध्ये जाऊन धर्मांतर व नाव बदलवून महिलेशी निकाह केला होता. या घटनेमुळे बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून यातील संशयितांची नावे गोपनीय ठेवली आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, यातील महिला हि प्रथमतः सन २०१७ मध्ये अवैधरित्या मामाच्या मदतीने भारतात येवुन घनसोली (नवी मुंबई) येथे वास्तव्यास होती. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातुन सदर बांग्लादेशी महिला व स्थानिक पुरुष यांच्यात ओळख होवून प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर सदर महिला अवैधरित्या बांग्लादेशात परत गेल्यावर ती गरोदर असल्याचे त्यांना समजले होते. त्यातून तीची प्रसुती होवुन तीने सहा अॉगस्ट २०१८ रोजी एका मुलीस
जन्म दिला होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये बाळासह ती पुन्हा अवैधरित्या भारतात आली. त्याकाळात सदर पुरुष व ती ‘लिव्ह ईन’ मध्ये राहत होते. त्यानंतर बांग्लादेशी महिला व तिचे बाळ पुन्हा बांग्लादेशात गेले. सन २०१९ मध्ये सदर महिला व तीचे बाळ असे परत अधिकृत पासपोर्ट व टुरिस्ट व्हिसावर भारतात आले. व्हिसा कालावधी संपल्यानंतर देखिल त्यांचे अवैधरित्या भारतात वास्तव्य सुरूच होते.
विसा कालावधी संपल्याने तीने पासपोर्ट फाडून नष्ट केला होते. नंतर पुन्हा ते बांग्लादेशात परत गेले. सन २०२२ मध्ये तिच्यासह राहणारा पुरुषाने बांग्लादेशात जावून धर्म व नाव बदलवून तेथे त्या महिलेसोबत निकाह केला. त्यानंतर महिला परत कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अवैधरित्या भारतात येवुन त्यांचे जन्माला आलेल्या अपत्यासह नाशिकमध्ये राहत होते. ती बांग्लादेशी महिला व तिचा पती यांनी
संगनमताने त्यांच्या मुलीचा बनावट जन्म दाखला तयार करत सदर बांग्लादेशी महिलेचे देखील बनावट आधारकार्ड तयार करून भारतीय मतदान कार्ड व पॅनकार्ड देखिल तयार केले होते. तीने भारतात मतदान केले असल्याची देखील कबुली दिली आहे. तसेच महिला प्रथमतः भारतात तिच्या मामाकडे आली, त्यांनी तिला अवैधरित्या आली असतांना देखिल आश्रय दिला व ते देखिल भारतात अवैधरित्या राहत असल्याचे समजुन आल्याने तीचे मामा व मामी यांना देखिल पथकांने शिक्रापूर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (३),२४९,३ (६), पारपत्र (भारतात प्रवेश) नियम १९५० चे कलम ३,६ परकीय नागरीक आदेश सन १९४८ चे कलम ३ (१) सह परकीय नागरीक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, डॉ. किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त संदिप मिटके, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, प्रविण माळी, उप निरीक्षक अभिजीत पवार, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, मनोहर शिंदे, वाल्मीक चव्हाण, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, समिर चंद्रमोरे, अतुल पाटील, मोहन कुवर, दिपक पाटील, श्रीमती एन.एस. निकम, अंबड दामिनी पथकतील ममता धुम, कोमल आव्हाड, बि.बि.ठाकरे, वैशाली घरटे, सुरसाळवे, प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार, जितेंद्र वजीरे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























