Homeक्राईमनामवंत बांधकाम व्यावसायिकांनी केली शासनाचीच फसवणूक

नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी केली शासनाचीच फसवणूक

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयाच्या जुन्या इमारतीची जागा ‘डायोसेशन ट्रस्ट्र’ च्या मालकीची असतानाही खोटा दस्तऐवज तयार करून भाडे रक्कमेचा अपहार तसेच जागेची विक्री करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तालय हडपण्याच्या या प्रयत्नात शासनाच्या महसुल, गृह, नगर विकास, विधी व न्याय विभागाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केलेले असल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक तुषार रतन देवरे (नेमणूक आडगाव पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन १९९० पासून आजपावेतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात ही फसवणूक झाली आहे. या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पंकज प्रभाकर मालपुरे, पिंकेश भुपेन्द्र शहा, प्रविण पंडीत उनवणे, सौ. माधुरी अरूण पाटील, सौ. कविता मधुकर पाटील, मे. राजवी ग्रह निर्माण प्रा.लि, मे. राजवी डेव्हलपर्स प्रा.लि. चे संचालक राजेन्द्र रसिकलाल शहा, शशीकांत खुशालदास शहा, श्रेणीक शशीकांत शहा, सिरीन चिनुभाई शहा, सौ. रजनी अमृतलाल खैरनार, वल्लभदास विरजी ठक्कर, वैभव विजय पाटील, किरण पुंडलिक चव्हाण, गौरव शशीकांत ठक्कर, भक्ती भाव हॉर्टीकल्चर प्रा.लि., दिपशिका फार्मस प्रा.लि., कर्मभुमी फार्मस प्रा.लि.चे संचालक जितेन्द्र मनोहरदास ठक्कर, निर्माण आश्रय डेव्हलपमेन्ट प्रा.लि. चे संचालक नेमीचंद पोद्दार, नवरत्न लॅन्ड्स अॅण्ड इस्टेट प्रा.लि. संचालक नेमीचंद पोद्दार तसेच लिहुन देणार (विक्री करणारे) नाशिक डायोसेशन कौन्सिल (मुंबई पब्लिक ट्रस्ट अन्वये रजि. पब्लिक ट्रस्ट रजि. नं. डी २. नाशिक नोंदणीकृत -कार्यालय शरणपुर) यांचेतर्फे विद्यमान बोर्ड ऑफ ट्रस्टी अविनाश गुरुपाद बलकुंदी (चेअरमन), डॉ. मनोहर सत्यवान हनबरहट्टी, सुगंध प्रसाद शिंदे, रेव्ह. नरेन्द्र रंगनाथ शिंदे, रेव्ह. प्रदीप लमुवेल कांबळे, राजेन्द्र बाबुराव सपताळ, डॉ. अरविंद गंगाधर मोरे, भास्कर जेकब साळवे, सौ. मार्गारेट रमेश गांगुर्डे, शार्लेट सॅमसन नाडे, डेव्हीड बाळोबा क्षेत्रे, श्रीमती मार्गेट नामदेव मते, प्रसाद उमराव अमोलिक, फ्रान्सीस डेव्हीड जॉन, शशीकांत जी. वंजारे, अविनाश बलकुंदी स्वतः व अ. नं. २ ते १५ यांचे जनरल मुखत्यार व विक्री दस्तऐवजास संमती देणार मे. हरियाली अॅग्रीकल्चर्स प्रा. लि. चे संचालक संदीप चंद्रकांत सराफ, ठक्कर डेव्हलपर्स लि. तर्फे राजेन्द्र मनोहरदास ठक्कर व इतर अशांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सहायक निरीक्षक तुषार रतन देवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन १९९० पासुन आज पावेतो पोलीस विभागाचे ताब्यातील नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रा. लि. कंपनीच्या नावाची मालमत्ता असल्याचे माहित असूनही आरोपींनी नाशिक डायोसेशन कौन्सिलचे विश्वस्त व विक्री करून घेणारे व विक्री दस्तास संमत्ती देणारे व इतर संबधीत सर्व आरोपींनी फौजदारीपात्र कट रचुन बनावट दस्तावेज तयार केला. खोट्या माहितीच्या आधारे खोटे दस्तावेज जाणीवपुर्वक तयार करुन शासकिय कार्यालयात सादर करुन आपसी संगणमताने फसवणुक करुन पोलीस आयुक्त, नाशिक यांचे ताब्यातील मालमत्तेच्या भाडे रकमेचा अपहार केला. सदरची मिळकत पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या ताब्यात असतांनाही शासनाची दिशाभूल करुन, शासनाच्या महसूल, गृह, नगर विकास, विधी व न्याय विभागाची व कंपनीची दिशाभुल करुन फसवणुक करून म्हणुन नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रा.लि. कंपनीच्या मालकीच्या अंदाजे किंमत ३०० कोटी रूपये किमतीच्या मिळकती स्वतःच्या फायदा करीता विक्री करून घेणार आरोपींच्या जनरल मुखत्यार व विक्री दस्तऐवजास संमती देणार मे. हरियाली अॅग्रीकल्चर्स प्रा. लि. चे संचालक संदीप चंद्रकांत सराफ, ठक्कर डेव्हलपर्स लि. तर्फे राजेन्द्र मनोहरदास ठक्कर व इतर संबंधित सर्व आरोपींनी नमुद मिळकतीचा व शासकिय रकमेचा (भाडे रक्कमेचा) अपहार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!