अहमदाबाद –
येथील विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेले एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) हे प्रवासी विमान काही क्षणातच नागरी वस्तीवर कोसळले. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. अपघातानंतर ज्वाळा व धुरांचे लोट लांब अंतरावरूनही दिसत असून तातडीने बचाव कार्यास प्रारंभ झाला आहे.
अपघातग्रस्त विमानात प्रवासी व क्रू मेंबर असे २४२ जण असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या अपघाताची भीषणता वाढली आहे. अहमदाबाद विमानतळानजिक असलेल्या मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळल्याचं वृत्त आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.


एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्या काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळलं. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडीओंमध्ये दिसतंय. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केलं आहे.

























