नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोहिनीदेवी रुंग्ठा बालमंदिरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात औक्षण व पुष्पवर्षावात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्व. सौ सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रश्मी सचिन भोसले, शिवसेना युवा नेते सचिन रमेश भोसले उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चौधरी व अधीक्षिका जयश्री देशमुख तसेच बहुसंख्य पालक उपस्थित होते. याप्रसंगी बालकांचे वाजत गाजत औक्षण करून स्वागत करण्यात आले. पावलांचे ठसे घेऊन प्रथम दिन उत्सव साजरा करण्यात आला. मुलांना खाऊ व फुगे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रश्मीताई व सचिन भोसले यांनी मुलांना संस्कारांचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. या मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.

























