नाशिक – विशेष प्रतिनिधी
कोणतेही पदग्रहण करतांना त्या पदाबरोबर त्याची जबाबदारी देखील चोखपणे पार पाडली पाहिजे, असे उद्गार रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी काढले. ग्लोबल व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. तर नेतृत्व हा गुण सर्वांमध्ये असतो. परंतु त्याचा विकास आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या संचालिका सौ. विजयालक्ष्मी मनेरीकर यांनी केले.
याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास डेमो सादर केला. सर्व श्रोते व उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात अभिमानाची झलक दिसून आली. हेडबॉय किरण पवार व हेडगर्ल मनाली चौधरी हिने
शाळेची दिली. सर्व मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. ‘रोटरी क्लब’ ची माहिती शाळेतील शिक्षक उल्हास बच्छाव यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते सर्व सदस्यांना बॅच प्रदान करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष हर्ष साठे, उपाध्यक्ष आश्लेषा अहिरे, सेक्रेटरी अजय उबाळे, खजिनदार आर्यन वाघचौरे आणि स्कूल ॲडव्हायझर मनाली चौधरी आणि अनिल मुसळे इत्यादींना बॅच प्रदान करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपआपली मते मांडून पदांबद्दल आदर व्यक्त केला. तसेच प्रतिज्ञा घेऊन शपथ ग्रहण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रो.वैशाली चौधरी, डॉ.सुप्रिया मंगळूरकर, पवन जोशी, अमित पगारे ,प्रणाली देशपांडे, मोना सामनेरकर व गौरी पाठक इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी सोनवणे व रीषम रॉय यांनी केले. ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

























