नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयातील ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या खांदेपालटात भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांची पंचवटी तर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड यांची अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये गुरूवारी हा खांदेपालट करण्यात आला आला आहे. बदली झालेले पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे – (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड (अंबड पोलीस ठाणे). भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील (पंचवटी) पोलीस ठाणे), अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक राकेश चौधरी (भद्रकाली पोलीस ठाणे), उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे (नाशिकरोड पोलीस ठाणे), देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ (उपनगर पोलीस ठाणे), चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे (दुय्यम निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे), सातपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक विश्वास पाटील (प्रभारी, चुंचाळे पोलीस चौकी), पोलीस निरीक्षक संजय पिसे (दुय्यम निरीक्षक, आडगाव पोलीस ठाणे), आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक सचिन खैरनार (दुय्यम निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे), भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख (प्रभारी, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे), नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी (दुय्यम निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे).

























