Homeशहर व जिल्हाप्रभाग एकमध्ये परिवर्तनाचे वारे सुसाट; मतदार शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ एकवटले

प्रभाग एकमध्ये परिवर्तनाचे वारे सुसाट; मतदार शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ एकवटले

– प्रविण जाधव, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे, नयना रामवंशी यांचा झंझावाती प्रचार

पंचवटी । प्रतिनिधी
महापालिका प्रभाग क्र. १ मध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रविणभाऊ रमेश जाधव (१ड), गणेशभाऊ चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिलाताई सुनिल निरगुडे (१क), नयनाताई रविंद्र रामवंशी (१अ) यांच्या प्रचारार्थ कंसारा माता चौकापासून रॅलीला प्रारंभ झाला. प्रभात नगर, एकता नगर, सोम मिसळ, संभाजी नगर,षलगरे कॉलनी, केतकी नगर, बोरगड, म्हसरूळ आदी परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. या दरम्यान प्रभागातील मतदार तसेच शिवसैनिकांनी यंदा परिवर्तन घडवणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेल्या आधाराची परतफेड मतदानाच्या रुपाने करणार असल्याची ग्वाही भगिनी वर्गाने दिली.

प्रभाग एकमध्ये २५ वर्षापासून एकाच पक्षाची सत्ता असूनही रस्ते, पाणी, स्वच्छता तसेच आरोग्याचा प्रश्न जैसे थे आहे. हा प्रभाग विकासापासून वंचित राहिल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन घडणे गरजेचे आहे. मागील नगरसेवकांनी कोणतेही लोकोपयोगी कामे केली नाही. त्यामुळे परिवर्तन हाच त्यावरील उपाय आहे. प्रविण जाधव यांनी कोणतीही सत्ता नसताना पदरमोड करून प्रभागात विकासाची कामे केली. कोविड सारख्या संकटात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे प्रविण जाधव असून ते आपल्या तीन सहकाऱ्यांना सोबत घेत नक्कीच प्रभागाचा कायापालट करतील. 

यंदाची निवडणूक शिवसैनिकांसाठी अस्मितेची लढत आहे. गेली अनेक वर्ष या प्रभागात पैसा व सत्ता याच समीकरणाचा बोलबाला होता. त्यामुळे विकासाची कामे झालीच नाही. हे चित्र बदलण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटले असून यंदा प्रभाग क्रमांक एक मध्ये परिवर्तन नक्की होईल. प्रविण जाधव व त्यांचे सहकारी महापालिका सभागृहात आपल्या कामाचा ठसा उमटवतील व प्रभागाचा कायापालट करतील.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ अस्तित्वात आणून महिला व युवतींना आधार दिला आहे. त्याची परतफेड मतदानातून नक्कीच करणार. प्रभाग एकमध्ये मागील कालावधीत कोणतीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आदी प्रश्न तसेच आहेत. यासाठी महिला व युवती यंदा परिवर्तन घडवणार व प्रविण जाधव आणि सहकाऱ्यांना बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास महिला मतदारांनी व्यक्त केला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!