– शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारही सरसावले
पंचवटी । प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक यंदा परिवर्तनाच्या ऐतिहासिक लढ्यासाठी सज्ज झाला आहे. पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा असे समीकरण जुळवून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या महाभागांपेक्षा जनतेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत असणारे व अडीअडचणी मध्ये आधारवड ठरणारे शिवसेना उमेदवार प्रविणभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॕनेलला विजयी करत यंदा परिवर्तन घडवण्याचा ठाम निश्चय मतदारांनी केला आहे. ‘खिच के ताण….धनुष्यबाण’ ही घोषणा आता मतदारांसाठी परवलीचा शब्द ठरली आहे.


पंचवटीतील मेरी व म्हसरूळ परिसराचा समावेश असणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये परिवर्तन घडविण्याची संधी मतदार हे सन २०१७ पासून शोधत होते. आता ती संधी चालून आल्याने त्याचे सोने करण्याचा निर्धार मतदारांनी रविवारी झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उपस्थितीद्वारे दाखवून दिला. या प्रभागातील प्रविणभाऊ रमेश जाधव (१ड), गणेशभाऊ चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिलाताई सुनिल निरगुडे (१क), नयनाताई रविंद्र रामवंशी (१अ) यांना संधी नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल नागरिकांनी शिवसेना नेतृत्वाचे आभारही व्यक्त केले.
सोमवारी शिवसेना उमेदवारांनी प्रविण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वृंदावननगर, स्नेहनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, गुलमोहर नगर आदी भागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. यावेळी मतदारांनी प्रविण जाधव व सहकाऱ्यांचे स्वागत करताना विजयासाठी आशिर्वाद दिले. लोकप्रतिनिधी नसताना प्रविण जाधव यांनी प्रभागात केलेली कामे असो वा कोविड सारख्या संकटात नागरिकांच्या हाकेला धावून जाणे असो, यातून आपल्या सामाजिक सेवेचा ठसा उमटवल्याचे गौरवोद्गार मतदारांनी काढले. यंदा आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तन घडवणारच असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.

























