नाशिक – विशेष प्रतिनिधी
देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार आकाश चंद्रकांत काळे (वय-२८ वर्षे रा. फ्लॅट नं ३०१, अक्षरा अव्हेन्यु, हिरावाडी त्रिकोणी बंगल्याजवळ, पाण्याच्या टाकी समोर, पंचवटी) यास गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड व कल्पेश जाधव यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पंचवटीतील सराईत गुन्हेगार आकाश काळे याच्या जवळ देशी बनावटीचे अग्निशस्त्र आहे. ही माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देण्यात आली. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे अशांनी त्रिकोणी बंगला, अयोध्या नगरी, पंचवटी नाशिक या परिसरात जावून सापळा लावला. त्यात आकाश काळे हा सापडला. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस हस्तगत करण्यात आले.
आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

























