Homeक्रीडाराज्य मानांकन टेबल टेनिस; सुक्रती शर्मा, स्वरा करमरकर, नायशा रेवासकर यांची विजयी...

राज्य मानांकन टेबल टेनिस; सुक्रती शर्मा, स्वरा करमरकर, नायशा रेवासकर यांची विजयी घोडदौड कायम

– ठाणे, पुणे, नाशिक, मुंबईकर खेळाडूंची आगेकूच…

नासिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या व मुलांच्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, मुंबईच्या टेबल टेनिसपटूंनी उपउपांत्य फेरीत शानदार विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेत सुक्रती शर्मा, स्वरा करमरकर, नायशा रेवासकर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

१७ वर्षाखालील मुलीच्या गटात नाशिकच्या दुसऱ्या मानांकित स्वरा करमरकरने ठाण्याच्या अन्वी गुप्ते ला  ३-२ ने पराभूत केले. अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात स्वरा ने ६-११ व ९-११ असे दोन गेम गमावल्याने ०-२ असे पिछाडीवर पडलेल्या स्वरा ने पुढील दोन गेम ११-४ ११-६ असे जिंकून बरोबरी साधली व आपले आव्हान टिकवण्यात यश मिळविले. शेवटच्या पाचवा गेम काउंटर अँटक पद्धतीने खेळून दोघींनी सामन्यावर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी १०-१० समान गुणापर्यंत हा सामना पोहोचला. सरतेशेवटी स्वरा ने मोक्याच्या क्षणी शेवटचे दोन गुण मिळवून सामना आपल्या बाजूने झुकविण्यात यश मिळवून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

दुसऱ्या सामन्यात बिगर मानांकित ठाण्याच्या वैदेही ठाणेकरने रायगडच्या पाचव्या मानांकीत अनिशा पात्रा चा १०-१२, ११-३, ८-११, ११-६, ११-५ असा ३-२ पराभव केला. या सामन्यात दोघींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. परंतु शेवटच्या गेम मधे खेळावर नियंत्रण ठेवत वैदेही हीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले व उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम मानांकित ठाण्याच्या सुक्रती शर्माने नाशिकच्या जान्हवी कळसेकरचा ११-६, १२-१०, ११-८ असा ३-० ने पराभव करून सफाईदार विजय मिळविला तर याच गटात पुण्याच्या तिसऱ्या मानांकित नायशा रेवासकर हीने औरंगाबादच्या अनन्या सोमानीचा ९-११, ११-५, ११-६, ११-५ असा ३-१ ने पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटात उपउपांत्य फेरीत पार्थ मगर (मुंबई) ने पुण्याच्या श्रेयस माणकेश्वर याचा ३-० असा तर इशान खांडेकर (पुणे) याने कोल्हापूरच्या संकल्प बांदिवडेकर याचा ३-० तसेच प्रतीक तुलसानी (ठाणे) याने मुंबईच्या अर्णव वाघ याचा ३-० व रामानुज जाधव (पुणे) याने ठाण्याच्या एकांश मदाने चा ४-१ ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीअखेर ठाणे, पुणे, टीएसटीए च्या टेबल खेळाडूंची विजयी घोडदौड चालू असून त्यामध्ये सान्वी पुराणिक, आरोही चाफेकर, अनन्या बेडिंगवाला, केशिक पुरकर, श्रेया गायकवाड, मायरा सांगेलकर यांचा समावेश आहे तर १५ वर्षाखालील पाटेकर, एकांश मदाने, निवान सेठ, श्रेयस माणकेश्वर, यश भंडारी यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!