Homeक्रीडाचौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरवात; नामांकित खेळाडूंचा समावेश

चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरवात; नामांकित खेळाडूंचा समावेश

नासिक – क्रीडा प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने व राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केशिका पुरकर चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन आज आमदार सीमाताई हिरे व आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, हाऊस ऑफ मॅच्युअल फंड चे श्री प्रमोद पुराणिक, सौ ज्योत्स्ना पुराणिक, नासिक जिमखाना कोषाध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष व आयोजन समिती चेअरमन शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, अलका कुलकर्णी, केशिक पुरकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी नरेंद्र छाजेड यांनी प्रास्ताविक केले.

या स्पर्धेच्या उद्घाटक व प्रमुख पाहुण्या सीमाताई हिरे, देवयानी फरांदे यांनी आपल्या मनोगतात क्रीडा क्षेत्रासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन या स्पर्धा चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. या राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अजय केवलरामानी, राज्य संघटना मानांकन कमिटी चेअरमन राज जयस्वाल, प्रवीण पाटील, केतकी करमरकर, चीफ रेफरी गौरव फणसाळकर, सुहास आगरकर, स्वाती आगरकर आदी मान्यवर तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व खेळाडू, क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सीमा कर्पे यांनी केले.

आज झालेल्या पुरुषांच्या एकेरीत पुण्याच्या बिगर मानांकित भार्गव चक्रदेव याने टीएसटीटीए च्या पाचव्या मानांकित मंदार हर्डीकर यांचा चुरशीच्या सामन्यात १२-१०, ८-११, १३-११, ६-११, ११-६ असा ३-२ ने पराभव केला. तसेच दुसऱ्या सामन्यात  टीएसटीटीए च्या शरवेय सामंत याने पुण्याच्या चवथा मानांकित शौनक शिंदेचा ११-८, ११-८, ११-५ असा सलग ३-० ने पराभव केला. पुरुषांच्या एकेरीत प्रथम मानांकित कोल्हापूरच्या अनिश सोनटक्के, नागपूरचा दुसरा मानांकित आदिश चिटणीस, टीएसटीटीए च्या तिसरा मानांकित सागर कस्तुरे आदी मानांकित खेळाडूंनी तिसऱ्या फेरीचे सामने जिंकून आपली वाटचाल सुरु ठेवली. 

महिलांच्या एकेरीत आज झालेल्या सामन्यांमध्ये प्रथम मानांकित ‘टीएसटीटीए’ ची अनन्या चांदे, ‘टीएसटीटीए’ ची दुसरी मानांकित मनुश्री पाटील, ठाण्याची तिसरी मानांकित श्रुती अमृते तसेच मुंबईची चवथी मानांकित सेन्होरा डिसुझा यांच्यासह नाशिकच्या सायली वाणी यांनी दुसऱ्या फेरी अखेरचे सामने जिंकून पुढील वाटचाल सुरु ठेवली. 

रविवारी (दि.२१) पुरुष, महिला तसेच १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटाचे उप उपांत्य, उपांत्य तसेच अंतिम फेरीचे सामने होणार आहे अंतिम फेरीचे सामने दोन वाजता सुरू होणार असून त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. बक्षीस समारंभास नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, माजी चेअरमन सोहनशेठ भंडारी, संचालक आकाश छाजेड, नासिक जिमखान्याचे सचिव राधेशाम मुंदडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांचा जास्तीतजास्त क्रिडा प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेखर भंडारी, अभिषेक छाजेड, सुहास आगरकर, सौ. स्वाती आगरकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुरुष एकेरी तिसरी फेरीचा निकाल

अनिश सोनटक्के (कोल्हापूर ) वि. वि. सोहम मते (पुणे) ११-७, ११-९, ११-५

अमिश आठवले (पुणे) वि. वि. आरुष गलपल्ली (नागपूर) ५-११, ११-६, ११-५, ७-११, ११-९

आयुष सोनवणे (टीएसटीटीए) वि. वि. वेदांग जोशी (पुणे) ११-७, ११-५, ११-९

कुशाल चोपडा (नाशिक) वि. वि. रजत तोरस्कर (पुणे) ११-७, ११-९, ११-५

सागर कस्तुरे (टीएसटीटीए) वि. वि. आदित्य जोरी (पुणे) ११-५, ११-३, ११-७

आदी चिटणीस (नागपूर) वि. वि. केवल विकमानी (ठाणे) ११-५, ११-४, ११-५

महिला एकेरी तिसर्याय फेरीचा निकाल

अनन्या चांदे (टीएसटीटीए) वि. वि. धनिका पवार (नाशिक) ११-३, ११-२, ११-२

सेन्होरा डिसुझा (मुंबई) वि. वि.  तितक्षा पवार (पुणे) ११-३, ११-५, ११-५

श्रुती अमृते (ठाणे) वि. वि. अन्वी गुप्ते (ठाणे) ११-३, ८-११, ९-११, ११-७, ११-२

मनुश्री पाटील (टीएसटीटीए) वि. वि. अनुष्का पाटील (ठाणे) ८-११, ११-९, १४-१२, ११-९

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!