पंचवटी – विशेष प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात झालेल्या राहूल धोत्रे या युवकाच्या खून प्रकरणातील संशयित व माजी नगरसेवक उद्धव निमसे याला शनिवारी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, बैलपोळ्याच्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहुल धोत्रे व त्याचा आतेभाऊ अजय कुसाळकर यांच्यावर किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. २९ ऑगस्टला उपचारादरम्यान राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला होता. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
उद्धव निमसे दि. १५ सप्टेंबरला गुंडा विरोधी पथकाला शरण आले होते. यावेळी न्यायलयाने निमसेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यावर निमसे यांना शनिवारी (दि.२०) पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे.
नांदूर नाका येथील राहुल धोत्रे प्रकरणात आडगाव पोलीसांनी जवळपास १५ आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेतील काही संशयित आरोपींना अद्याप पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत.

























