Homeक्राईमगुजरातमधील दोन चेन स्नॅचर इंदिरानगर पोलिसांनी केले जेरबंद; आंतरराज्यीय टोळीचे सदस्य

गुजरातमधील दोन चेन स्नॅचर इंदिरानगर पोलिसांनी केले जेरबंद; आंतरराज्यीय टोळीचे सदस्य

नाशिक – विशेष प्रतिनिधी
गुजरातमधून नाशिकमध्ये येत इंदिरानगरमध्ये चेन स्नॅचिंगसाठी सावज धुंडाळताना दोघा अट्टल चेन स्नॅचरना इंदिरानगर पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच अॉगस्टला चेन स्नॅचिंग केल्याची कबुली त्यांनी दिली असून दोघांवर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान अशा चार राज्यांत अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर दिनेश बजंरगे (वय – ४०) व जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी (वय ४२) अशी दोघा संशयितांची नावे असून ते अहमदाबादमधील छारानगर, कुबेरनगर रेल्वेस्टेशन, सरदारग्राम येथील आहेत. दोन्ही आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असुन त्यांचेवर वैयक्तिक तसेच टोळीने केलेले विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

इंदिरानगरसह शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंग सारख्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ – २) किशोर काळे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी हद्दीमध्ये सतर्क गस्त करुन चेन स्नॅचिंग तसेच इतर गुन्हे होणार नाहीत, याबाबत सतर्क पेट्रोलिंग करणेबाबत व पेट्रोलिंगदरम्यान संशयित इसमांवर स्टॉप अॅण्ड सर्च, टवाळखोरांवर कारवाई करणे बाबत मोहिम राबविणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहायक निरीक्षक (गुन्हे) सुनिल अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने स्टॉप अँण्ड सर्च, टवाळखोर कारवाई व सतर्क गस्त सुरु केली आहे. 

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथक आठ अॉगस्ट रोजी सायंकाळी गस्त घालत होते. उपनिरीक्षक संतोष कुंदे, पोलीस अंमलदार सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड व प्रमोद कासुदे हे वडाळा गांव परिसराकडुन रविशंकर मार्ग कडे जात असतांना मदीना लॉन्स (वडाळागांव) जवळ एक काळया रंगाची मोटारसायकल ही वडाळागांव कडुन डी.जी.पी नगर दिशेने जाताना दिसली. विना नंबर प्लेट तसेच मोटार सायकलवरील चालवणाऱ्या इसमाने हेल्मेट घातलेले व पाठीमागील इसम हा मास्क व टोपी परिधान केलेला दिसला.

त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना मोटारसायकल थांबविण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांना पाहुन त्यांची मोटार सायकल ही भरधाव वेगाने चालवण्यास सुरुवात केली. मात्र ते ऐकण्यास तयार नव्हते. गुन्हे शोध पथकाने त्यांचा थरारक पाठलाग करत असताना एका गतीरोधकावर त्यांचा वेग कमी झाल्याने त्यांची मोटासायकल थांबविण्यात यश आले. परंतू ते मोटारसायकल सोडुन पळून जाण्याचे प्रयत्नात असतांना त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पाच अॉगस्टला सकाळी आठ वाजता उपनगर पोलीस ठाणे चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. तसेच पुन्हा नाशिक शहरात चैन स्नॅचिंग करिता आले होते व रस्त्याने एकटी असलेल्या गळ्यात सोने घातलेल्या महिलेच्या शोधात होते. परंतू त्या अगोदरच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने त्यांना थरारक पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!