Homeक्राईमगुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ठग अखेर ठाण्यातून जेरबंद

गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ठग अखेर ठाण्यातून जेरबंद

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत त्यांच्या पैशांचा अपहार करून फरार असणारा संशयित तेजस मुधकर कोळी (रा. रो हाउस नं. ०३, ओम साई समर्थ केंद्रजवळ, कार्तिकेय नगर, नाशिक) यास अखेर ठाण्यातील वागळे परिसरातून जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, प्रकाश मारूती पवार (वय ५५ रा. श्रीसंकुल हौसिंग सोसायटी, ०५, पांडव नगरी, कामटवाडे शिवार, नविन नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर कोळी व तेजस कोळी (रा. रो हाउस नं. ०३, ओम साई समर्थ केंद्रजवळ, कार्तिकेय नगर, नाशिक) यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तीन जुलै २०२४ ला फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र तेव्हापासून आरोपी फरार होते.

या गुन्हयाचा समांतर तपास करित असतांना हवालदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, आरोपी तेजस मुधकर कोळी हा ठाण्यातील वागळे इस्टेट परीसरात आहे. याबाबत त्यांनी वरीष्ठांना माहिती दिल्यानंतर कारवाईचे आदेश मिळाले. त्यानुसार
उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाजीमखान पठाण यांनी ठाण्यात जाऊन सापळा रचला. बुधवारी रात्री ८.१५ वाजता तेजस कोळी हा वागळे इस्टेट परीसरातील सुजाता बिल्डींग येथे आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यास अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, नाजीमखान पठाण, महेश साळुंके रोहिदास लिलके, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, अमोल कोष्टी यांनी ही कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!