Homeक्रीडारामशेज किल्ल्यावर भरपावसात राबवली स्वच्छता व संवर्धन मोहिम

रामशेज किल्ल्यावर भरपावसात राबवली स्वच्छता व संवर्धन मोहिम

नाशिक – विशेष प्रतिनिधी

‘आपला मावळा’ या दुर्गसंवर्धन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन मोहिम रविवारी भरपावसाची तमा न बाळगता उत्साही जोषात रामशेज किल्ल्यावर राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. ट्रिगार्ड लावणे, सूचना फलक, सौर दिवे, आणि मुख्य प्रवेशद्वार बसवण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दक्षिण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ नेते शेटे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उदय सांगळे, नाना पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, समता परिषद जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, पराग भगरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी किल्ल्यावर प्रभू श्रीराम व सीतामाई यांचे दर्शन घेण्यात आले. सर्व मावळ्यांनी मिळून जिजाऊ वंदना केली आणि “आपला मावळा…गडकोट संवर्धन प्रतिज्ञा” घेतली. पावसाच्या हलक्या सरी आणि धुकट हवामानातही गडप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गड उत्साहाने न्हालेला होता. रामशेज किल्ला खर्‍या अर्थाने शिवगर्जनेने दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, ही केवळ गडांची साफसफाई नसून, ही आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अभिमानाचे जतन करण्याची ध्यासमय मोहीम आहे. “आपला मावळा” या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहून मन खूप आनंदित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग हे आपल्या अस्मितेची आणि शौर्याची साक्ष आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही कायम कार्यरत राहू, असे अभिवचन त्यांनी दिले. ही केवळ सुरुवात आहे… महाराष्ट्राचे प्रत्येक दुर्ग तेजस्वी करण्यासाठी आमची पावलं अविरत चालत राहतील, असा विश्वासही खा. लंके यांनी बोलून दाखवला.

या उपक्रमातून इतिहासाचे जतन होईल आणि मराठी माणसाला अभिमानाचे स्फुरण चढेल अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्याचे कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल ६५ महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. स्वराज्याच्या प्रेरणेने स्फूरलेल्या या ऐतिहासिक वास्तूची आपल्या हातून थोडी थोडकी सेवा घडली याचा आनंद असल्याचं पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!