नाशिक – विशेष प्रतिनिधी
माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावूनही माहेरून पैसे आणत नसल्याने एका विवाहितेला मारहाण शारीरिक छळ होत असल्याने कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. असे असून देखील पोलीस यंत्रणा राजकीय दबावापोटी माहेरच्यांकडून गुन्हा देखील दाखल करत नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या मंडळींना अखेर पोलीस आयुक्तालय गाठावे लागले. अखेर तीन दिवसांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका विवाहितेला मरणानंतर देखील न्यायासाठी यातना भोगाव्या लागल्या हे दुर्दैव. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की , शनिवार दि.२७ जुन रोजी सातपूर येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री उर्फ पुजा महेश गुंजाळ वय (२२ वर्षे) या विवाहितेला माहेरहुन ५० हजार रूपये आणण्यासाठी दबाव टाकुन पैसे न आणल्याने मयत यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून, शिवीगाळ करून त्यांचा आतोनात शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. सासरच्या या शारीरिक व मानसिक स्थळाला कंटाळून विवाहिता भाग्यश्री उर्फ पूजा गुंजाळ हिने आत्महत्या केली. पूजाचे शव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले गेले. माहेरच्यांनी आमच्या मुलीला न्याय द्या असा आक्रोश करत सातपूर पोलीस स्टेशन गाठले. परंतु राजकीय वरदहस्त असलेल्या सासरच्या मंडळीं विरोधात सातपूर पोलीस अधिकारी मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पाऊल उचलत नव्हते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दोन दिवस सातपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून देखील गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी संबंधितांवर गुन्हा दाखल होण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे जावून न्याय मागितला. शेवटी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये ३० जून रोजी सातपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती महेश वसंत गुंजाळ (वय ३१, सासु सौ. सुरेखा वसंत गुंजाळ (वय ५२), मावस सासरे नामे वसंत गोवींद गुंजाळ (वय ५५ वर्षे रा. प्लॉट नं.२४, सिध्द हनुमान मंदीराजवळ, हिरे गार्डन, अशोकनगर, सातपुर), नणंद गौरी रोकडे (वय ३२, रा. पाथर्डी फाटा).मावस सासरे प्रमोद कु-हाडे (रा. मारवाही ता. निफाड), मावस सासु सौ. जया प्रमोद कु-हाडे (रा.मारवाही ता.निफाड) यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली.
मागील काही महिन्यांपूर्वी पुणे येथील हगवणे परिवारातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर अख्या महाराष्ट्राने निषेध नोंदवला. तोच प्रकार माझ्या बहिणी सोबत झाला. परंतु गुन्हा नोंद करण्यासाठी आम्हास तीन दिवस मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाही. पोलिसांवर राजकीय लोकांनी टाकलेल्या दबावामुळे आमची साधी दखल घेतली गेली नाही. शेवटी पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांनी आमचे हाक ऐकली व गुन्हा नोंद करण्यासाठी आदेश दिले. त्यामुळे यापुढेही आम्हाला न्याय मिळेल का? अशी शंका उपस्थित केले जात असून गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
– अमोल कापसे, मृत विवाहितेचा भाऊ

























