Homeशैक्षणिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व 'ईपी रॉक' कंपनीमध्ये 'सीएसआर' निधी देण्याबाबत...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘ईपी रॉक’ कंपनीमध्ये ‘सीएसआर’ निधी देण्याबाबत सामंजस्य करार

पुणे –
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘ईपी रॉक’ या कंपनीमध्ये ‘सीएसआर’ निधी देण्याबाबत सामंजस्य करार नुकताच पार पडला. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यापीठ उपकेंद्र हे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

ईपी रॉक ही कंपनी जगभरामध्ये खाणकाम उद्योगांमध्ये अग्रगण्य कंपनी म्हणून कामकाज करीत आहे. कंपनीतर्फे (सीएसआर) सामाजिक दायित्व निधीतून विद्यापीठ उपकेंद्र नाशिकसाठी १२५ केव्हीए (KVA) च्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ७५ लाख निधी उपलब्ध केलेला आहे. सदर कंपनीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प वर्ष ऑगस्ट २०२५ मध्येच विद्यापीठ उपकेंद्रात कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे.

याप्रसंगी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी तसेच या कंपनीच्या वतीने कंपनीचे व्यवस्थापक आशिष जैन व धनराज पुरी यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱ्या या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. देविदास गोल्हार, सीएसआर समन्वयक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!