Homeक्राईमजनता नागरी सहकारी पतसंस्था फसवणूक प्रकरण; तीन वर्षांपासून फरारी संशयित जाळ्यात

जनता नागरी सहकारी पतसंस्था फसवणूक प्रकरण; तीन वर्षांपासून फरारी संशयित जाळ्यात

– २९ कोटींचे बहुचर्चित प्रकरण…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक यांनी कट कारस्थान रचून संगणमताने केलेल्या २९ कोटींच्या फसवणूक प्रकरणात तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणारा दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर (जि. पालघर) येथून जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता ३० अॉगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक यांनी कट कारस्थान रचून संगणमताने जाणून बुजून खोटया नोंदीद्वारे चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून संस्थेचे ठेवीदार व सभासदांची फसवणूक करून ठेवी स्विकारण्याची मर्यादा नसतांना जादा व्याज दराचे आमिष दाखवत ठेवीदारांकडुन ठेवी गोळा केल्या. त्यांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची व सभासदांची रक्कम २९,०२,४१५,३१/- रूपयांची फसवणूक केली म्हणुन सात नोव्हेंबर २०२२ रोजी येवला शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४०९,१२० (ब) ३४ व महाराष्ट्र ठेविदार (वित्तीय संस्थामधिल) हितसंबधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (नाशिक ग्रामीण) मार्फत सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्हयाचा आढावा घेत गुन्हे निर्गतीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर अधीक्षक तेगबीरसिंग संधु, उप अधिक्षक श्रीमती जे एम करंदीकर यांनी यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकाने आर्थिक गुन्हे शाखेच्या गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे यातील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर, जि. पालघर येथून ताब्यात घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर अधीक्षक तेगबीरसिंग संधु, उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) श्रीमती जे. एम. करंदीकर यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस अंमलदार प्रविण मासोळे, कैलास काकड, मोहन पवार, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे.

—————————————————-

आरोपीताविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून त्या गुन्हयात सुध्दा तो फरार आहे.

– येवला शहर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. २३५/२०२२ कलम ४२०,४०६,४०८,४०९,१२०(ब),३४ भादविस सह एमपीआयडी कलम ३,४ प्रमाणे.

– येवला शहर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. २३६/२०२२ कलम ४२०,४०६,४०८,४०९,१२० (ब),३४ भादविस सह एमपीआयडी कलम ३,४ प्रमाणे.

– येवला शहर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. २३७/२०२२ कलम ४२०,४०६,४०८,४०९,१२०(ब),३४ भादविस सह एमपीआयडी कलम ३,४ प्रमाणे.

– येवला शहर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. २३८/२०२२ कलम ४२०,४०६,४०८,४०९,१२०(ब),३४ भादविस सह एमपीआयडी कलम ३,४ प्रमाणे.

– येवला शहर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. २४२/२०२२ कलम ४२०,४०६,४०८,४०९,१२०(ब),३४ भादविस सह एमपीआयडी कलम ३,४ प्रमाणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!