Homeशहर व जिल्हापोलीस आयुक्तालय सार्वजनिक गणेशोत्सव -२०२४; सरदार चौक मित्रमंडळ, श्री. प्रतिष्ठान मित्रमंडळ विजेते

पोलीस आयुक्तालय सार्वजनिक गणेशोत्सव -२०२४; सरदार चौक मित्रमंडळ, श्री. प्रतिष्ठान मित्रमंडळ विजेते

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर पोलिसांतर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव-२०२४ पारितोषिक वितरण सोहळा
पोलीस आयुक्त कार्यालय संपन्न उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत परिमंडळ एकमध्ये पंचवटीतील सरदार चौक मित्रमंडळ तर परिमंडळ दोनमध्ये वडाळा-पाथर्डी रोडवरील श्री. प्रतिष्ठान मित्रमंडळ (श्रद्धा विहार) हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व्यासपिठावर उपस्थित होते. 

सार्वजनिक गणेशोत्सव-२०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आदर्श गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच परिमंडळ-१ व परिमंडळ-२ मध्ये उत्कृष्ट मंडळांची निवड करणारे परिक्षण समितीचे सदस्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे, चंद्रकांत पाडवी यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————————-

पारितोषिक विजेते गणेश मंडळे सन २०२४

परिमंडळ एक –

प्रथम क्रमांक –
सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी.

द्वितीय क्रमांक –
श्री. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मित्रमंडळ, जुनी तांबट, भद्रकाली.

तृतीय क्रमांक –
विघ्नहर्ता मित्रमंडळ, राजपाल कॉलनी, पंचवटी.

उत्तेजनार्थ –
– न्यू स्फुर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ, रविवार पेठ.
– सार्वजनिक वाचनालय, नेहरु गार्डन.

परिमंडळ दोन –

प्रथम क्रमांक –
श्री. प्रतिष्ठान मित्रमंडळ (श्रद्धा विहार), वडाळा-पाथर्डी रोड.

द्वितीय क्रमांक –
आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटी, नाशिकरोड.

तृतीय क्रमांक – (संयुक्तपणे)
– अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर गाव.
– कपालेश्वर मित्रमंडळ, उपनगर.

उत्तेजनार्थ –
– सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सातपूर कॉलनी.
– शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था, देवळाली कॅम्प.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!