Homeक्राईमघोटी येथील दरोड्याचा मास्टरमाईंड सराफी व्यावसायिकच

घोटी येथील दरोड्याचा मास्टरमाईंड सराफी व्यावसायिकच

नाशिक – विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गावरील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटी येथे आठ दिवसांपूर्वी भरदिवसा सराफ बाजारात कल्याणच्या एका सराफ व्यापाऱ्यास चोरट्यांनी धक्काबुक्की करत रोख रकमेची बॅग हिसकावून पळ काढला होता. या दरोड्याचा मुख्य सुत्रधार स्थानिक सराफी व्यावसायिकच असल्याचे समोर आले असून पाच सराईतांना हाताशी धरून हा दरोडा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सराफासह तिघांना अटक करण्यात आली असून
चार जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील चोरट्यांचा मुख्य सूत्रधार घोटी येथील शुभऋषी दत्ताजी कपिले अँड सन्सचे शुभम कपिले हा सराफी व्यावसायिकच असल्याची कबुली संबंधित संशयितांनी दिली आहे. पोलिसांनी कपिलेसह तिघांना अटक केली असून, तीन सराईत गुन्हेगार फरार आहेत. या घटनेने सराफी व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दि. २६ जून रोजी कल्याण येथील सराफी व्यावसायिक अमन अशोक शहा हे भरदुपारी घोटी येथे आले होते. ऑर्डरचे दागिने देऊन त्याबदल्यात स्थानिक व्यापाऱ्यांकडून त्यांनी जवळपास ५१ हजार रुपयांची रोख रक्कम घेतली होती. ती घेऊन ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी शहा यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला होता. काही क्षणातच स्थनिक युवक व नागरिकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करीत सूरज तायड(रा. नाशिक रोड) यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तपासाअंती सूरज अलोक शिंदे (रा. नाशिक) या संशयितासही घोटी पोलिसांनी अटक केली असता, या दोघांच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यानुसार घोटी येथीलच स्थानिक सराफ व्यापारी शुभम कपिले यानेच संबंधित चोरट्यांना या व्यापाऱ्याची माहिती देत दरोड्याचा प्लॅन रचल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे घोटी पोलिसांनी स्थानिक सराफी व्यावसायिक शुभम कपिले यालाही मंगळवारी (दि. १) ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्धही दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घोटीचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण उदे, हवालदार गणेश देवकर, सुनील पाटील, तुषार ढगे, संतोष नागरे करत आहेत. घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी या दरोड्याच्या घटनेचे सूक्ष्म निरीक्षण केले असता, यामागे मोठी टोळी व स्थानिक कुणीतरी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पकडण्यात आलेल्या सूरज तायडेकडून अलोक शिंदेसह आणखी तीन साथीदारांची नावे मिळाली होती. पोलिसी खाक्या दाखवल्याने सराफी व्यापारीच याचा मास्टर माइंड असल्याचे पुढे आले. यातील तिघे फरार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!