Homeधार्मिकसेवेकर्‍यांनी आपल्या जीवनात भागवत आचरणात आणावा - गुरुपुत्र आबासाहेब मोरे

सेवेकर्‍यांनी आपल्या जीवनात भागवत आचरणात आणावा – गुरुपुत्र आबासाहेब मोरे

मथुरा – विशेष प्रतिनिधी
भगवान श्रीकृष्णाच्या पुण्यभूमीत मथुरा येथे श्रीमद् भागवत सप्ताह करणारे सारे सेवेकरी खरोखर पुण्यवान आणि भाग्यवान आहेत. भागवतामध्ये जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सेवेकर्‍यांनी केवळ पठण करून थांबू नये तर भागवत आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा, असे मौलिक विचार गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी मांडले. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सेवामार्गातर्फे भागवत सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांचा सत्संग मोठ्या उत्साहात पार पाडला. त्यावेळी त्यांनी भागवताचे माहात्म्य सांगितले.

श्री. मोरे म्हणाले की, भागवतात नाम आणि संगतीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपण सतत भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. मात्र त्याउलट आपण वागत असतो. एखाद्याचा द्वेष करून त्या व्यक्तीचे सतत स्मरण ठेवतो. आपण संपूर्ण जीवनात भगवंताचे स्मरण ठेवले तर अखेरच्या क्षणी देखील भगवंतच आपल्या स्मरणात राहील आणि आपला पुढचा प्रवास सुखकर होईल. त्यामुळे नामाशिवाय तरणोपाय नाही. आपल्या विचारात, अंतःकरणात सतत परमेश्वराचे स्मरण ठेवायला हवे. त्यामुळे भौतिक गोष्टींची इच्छा देखील कमी होत जाते, कारण जीवनाच्या अखेरपर्यंत भौतिक गोष्टींचा हव्यास काही कमी होत नाही. एखादी इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी यासाठी आपण प्रयत्न करतो. भागवत पारायण केल्यानंतर इथून जाताना एक संकल्प आपण जरूर करावा की, यापुढे कोणत्याही गोष्टीचा हव्यास आपण करणार नाही. जे आहे त्यामध्ये समाधान मानू. विशेष म्हणजे परमेश्वराची सेवा करताना सुख सुविधांकडे पाहण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत सेवा रुजू करावी, म्हणजे ती सेवा परमेश्वराला अधिक प्रिय होते असा उपदेश त्यांनी केला.

सेवेला भक्ती आणि श्रद्धेची जोड हवी..

कोणत्याही सेवेला भक्ती आणि श्रद्धेची जोड असेल तर ती सेवा फलश्रुत होते. अन्यथा कितीही मोठ्या सेवा करा त्याचा काहीही उपयोग होत नाही. भक्ती आणि श्रद्धा निर्माण होण्यासाठी आधी आपण भक्त बनले पाहिजे. त्याकरिता जीवनात एकदा तरी भागवताचे पठण करून भागवताचे सार लक्षात घेतले पाहिजे. भागवतात भक्ती मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे. भागवतामुळे भक्ती वृद्धिंगत होते असे विवेचन आबासाहेब मोरे यांनी केले.

संतान गोपाळ मंत्रानुष्ठान व श्रीकृष्ण दोलोत्सव..

सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उत्साहात वाचन झाले आणि दुपार सत्रात निरूपणानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुयोग्य संतान प्राप्तीकारक श्री संतान गोपाळ मंत्रानुष्ठान आणि श्रीकृष्ण दोलोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. उद्या ३० जून रोजी कन्याविवाहकारक श्री कात्यायनी पूजन व मंत्रानुष्ठान तसेच गिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकूट हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!