-
नाशिक – विशेष प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील प्रख्यात शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर ‘फेक अकाऊंट’ द्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत शिंतोडे उडवण्याचा निंदाजनक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी मेटाकडून संबधित अकाऊंट धारकाची माहिती मागवल्यानंतर ओझर येथील पत्रकाराचे मोबाईल व टॅब ताब्यात घेण्यात आले आहे.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर येथील स्थानिक वार्ताहर व पत्रकार संशयित सुदर्शन दिलीप सारडा (वय ३९, रा. ओझरमिग, ता. निफाड) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असून त्याचा मोबाईल व टॅब ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यातील ४३ वर्षीय पिडीता ही गंगापूर रोडवरील प्रख्यात शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. सन २०२३ पासून अनोळखी संशयिताने फेसबुकवर संस्थेच्या नावाशी साधर्म्य असलेले फेक अकाऊंट व युआरएल बनवून अनेक पोस्ट व मजकूर अपलोड करत सार्वजनिक केला. याच मालिकेत पिडीत महिला रजिस्ट्रारचे संस्थेतील अनैतिक संबंध असल्याचा धक्कादायक व आक्षेपार्ह दावाही करण्यात आला होता. आपल्याबाबत वैयक्तिक बदनामी करणारा हिनकस मजकूर प्रसारीत होत असल्याने एप्रिल महिन्यात सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदवली होती.

























