Homeक्राईमपंचवटीत बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून तिघा बालकांचा मृत्यू

पंचवटीत बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून तिघा बालकांचा मृत्यू

नाशिक – विशेष प्रतिनिधी
रविवारी खेळण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या विडी कामगार नगर परिसरातील तीन अल्पवयीन मुलांचा बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलीस व अग्निशमन दलाने नागरिकांच्या मदतीने शोध मोहिम राबवून तिनही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. विशेष म्हणजे तिघा मृत मुलांचे नाव साई होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई गरड, साई जाधव, साई उगले अशी तिघा मृत मुलांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढताच कुटुंबियांनी घटनास्थळी हंबरडा फोडला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, साई गरड, साई मोहिते, साई उगले हे तिघेही मित्र रविवारी खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र त्यानंतर घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. याबाबत आडगाव पोलिसांकडेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी नजिकच्या लॉन्स व इतर ठिकाणी या मुलांचा शोध घेतला. परंतू त्यास यश आले नाही. दरम्यान सोमवारी सकाळी या खड्डयाच्या काठाशी काहींना कपडे व चपला आढळून आल्या. याबाबतची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गिते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काठावर सापडलेले कपडे बेपत्ता मुलांच्या अंगावरील कपड्याशी मिळतेजुळते असल्याने तत्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत गाळात अडकलेले तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. गाळामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून आडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

खेळण्यासाठी घराबाहेर पडलेले हे तिन्ही मित्र पाटानजिक असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर पोहोचले. तिथे इमारतीसाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्डयात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. पाणी बघून तिघांना पाण्यात खेळण्याचा मोह झाला असावा. तिघेही कपडे काढून पाण्यात उतरले. मात्र खड्डयाची खोली, पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. संबंधित बांधकाम साईट विहान ग्रुपची असल्याचे तसेच ‘द व्ही पार्क’ या प्रकल्पाचे काम सुरू होते. खड्डयाच्या भोवती सुरक्षेसाठी पत्रेही लावण्यात आले होते. मात्र तिथे सुरक्षा रक्षक होते का, याबाबत उलगडा होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!