Homeक्रीडादरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद; पंचवटी पोलिसांची कामगिरी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद; पंचवटी पोलिसांची कामगिरी

– संभाव्य गुन्हा टळला…

पंचवटी : प्रतिनिधी
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांना यश मिळाले आहे. यातील एक गुन्हेगार हा तडीपार तर उर्वरीत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात पंचवटी पोलीस यशस्वी झाले आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव, तसेच आगामी मनपा निवडणूक या अनुषंगाने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन हद्दीत सतर्क पोलीस गस्त करणे, टवाळखोर कारवाई, गुन्हे प्रतिबंध इ. कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार हे गुरुवारी मध्यरात्री सुमारास गस्त घालत असतांना माहिती मिळाली की, वज्रेश्वरी पाटालगत असलेल्या एन.आय.टी. कॉलेज समोर रोडवर ४ ते ५ जण अंधारामध्ये संशयास्पद हालचाली करत आहे. त्यांच्याकडे हत्यारे आहे.

ही माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खात्री केली असता, त्याठिकाणी ४ ते ५ इसम अंधारात संशास्पद हालचाली करतांना दिसले, तेव्हा पथकाने सापळा रचला. पोलीस आल्याची चाहुल लागल्याने संशयित सैरावैरा पळू लागले. पोलीस पथकाने पाठलाग करून काही अंतरावर एन.आय.टी.कॉलेजसमोर रोडवर चौघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अजय चंदर कुंदे (२३ रा.मुंजाबा चौक, गणेशवाडी, पंचवटी), जितेश उर्फ गुड्डु चिंतामण फसाळे (२४, रा. मुंजाबा चौक, गणेशवाडी, पंचवटी), कुणाल सुनिल चौरे (२५, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, सुदर्शन कॉलनी, पंचवटी) रोशन मधुकर गायकवाड (२१, रा. पगारे रॉकेल केंद्राजवळ, नवनाथनगर, पंचवटी) यांना ताब्यात घेतले. तर टिल्लु अण्णा पवार (रा. शनिमंदिराजवळ, पंचवटी) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र त्यानंतर त्याचा माग काढून ताब्यात घेण्यात आले. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून, रोख पैसे सोन्याचे दागिणे, मोबाईल आदी धाक दाखवून चोरी करण्याच्या इरादयाने येथे थांबलो असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व गुन्हेगार हे रेकॉर्डवरील असून टिल्लु अण्णा पवार हा तडीपार करण्यात आलेला होता.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त (परिमंडळ एक) श्रीमती मोनिका राऊत, सहायक आयुक्त पंचवटी विभाग) श्रीमती संगिता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सतिश शिरसाठ, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे, लोणारे, गायकवाड, अंकुश काळे, परदेशी, बालीकर, वायंकडे, चितळकर, पवार, देशमुख, गंदलवाड,महिला पोलीस शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!