Homeशहर व जिल्हानाशिकमध्ये रात्रीपासून संततधार; गोदावरीला पूर

नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार; गोदावरीला पूर

नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वरला झालेला ढगफूटी सदृश्य पाऊस तसेच शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत गुरूवारी सकाळनंतर झपाट्याने वाढ होत आहे. गोदावरी पात्राबाहेर पडल्याने घाटावरील सांडवे तसेच लहान मंदिरे पाण्याने वेढली आहेत. नाशिकला पावसाचा ‘यलो अलर्ट’ असल्याने नाशिककरांनी काळजी घ्यायची आहे.

नाशिक शहर व ग्रामीण भागात कालपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्र्यंबकेश्वर बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने बाजारपेठेसह विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे भाविकांना हालअपेष्टा सहन करावी लागली. बुधवारी रात्रीनंतर शहर व लगतच्या ग्रामीण भागात संततधारेला सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. रात्री सुरू झालेला पाऊस गुरूवारी दुपारपर्यंत कोणतीही उसंत न घेता सुरु होता. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या हनुमानाच्या पायाला पाणी लागले असून सांडवे व लहान मंदिरेही पाण्याने वेढले गेले. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून य.म. पटांगण व लगतचा परीसर पाण्याखाली गेला आहे. रामकुंडालगत असलेल्या पार्किंगमधून तातडीने वाहने हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

संततधारेमुळे मेनरोड, दहीपूल, भद्रकाली, शालीमार, महात्मा गांधी रोड, रविवार पेठ तसेच विविध बाजारपेठांमधील उलाढाल मंदावली होती. शाळेत जाणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनाही संततधारेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक भागातील वाहतूक मंदावली आहे. नाशिकरोड, सिडको, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प परिसरातही संततधार सुरूच आहे. पावसाने उसंत न घेतल्यास गोदावरीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदाकाठचे रहिवाशी तसेच व्यापारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!