Homeधार्मिकअमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिसमध्ये विश्वशांती महोत्सव उत्साहात

अमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिसमध्ये विश्वशांती महोत्सव उत्साहात

– विश्वशांतीसाठी अध्यात्म गरजेचे: गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे

नाशिक । प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेच्या सिएटल आणि लॉस एंजलिस शहरांमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी विश्वशांती महोत्सव अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी तसेच श्रीयंत्र पूजन, स्वामी पालखी सोहळा, स्वामी पादुका दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम हे सारे उपक्रम मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले.
सिएटलमध्ये बालसंस्कार विभागातर्फे नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय सुरेख सादरीकरण करण्यात आले. सर्वांनी बाल सेवेकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी साई भक्त वामशी शेट्टी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर लॉस एंजलिस (कॅलिफोर्निया) येथील कार्यक्रमात बाल संस्कार विभागाच्या मुलांनी विविध स्पर्धा, उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने आंतरिक शांती ते विश्वशांती ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील स्पर्धकांचे सादरीकरण पाहून उपस्थित श्रोत्यांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेतला. 

विश्वशांतीसाठी अध्यात्म गरजेचे : नितीनभाऊ मोरे

सिएटल आणि लॉस एंजलिस येथील कार्यक्रमात गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विश्वशांतीसाठी अध्यात्मशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. येणारा काळ कठीण असला तरी सेवेकर्‍यांनी आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. त्याचप्रमाणे मुलांवर संस्कार होणे ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीला मोबाईलचे व्यसन लागले असून पालकांनी जागरूक राहून मुलांवर चांगले संस्कार रुजवावेत असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सेवामार्गाच्या अठरा विभागांची माहिती दिली.

कॅलिफोर्निया येथील महोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती

या महोत्सवाला “वूमन ऑफ द इयर २०१२”च्या मानकरी आणि एसएमएपी-एलएच्या अध्यक्षा सौ.अपर्णा हांडे, युनायटेड इंडियन असोसिएशन्स ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या संघटनेचे चेअरमन केवळ कंदा, न्यूरोलॉजिस्ट डॉ. श्रीकृष्ण वैद्य व डॉ. रोहिणी जोशी,इर्विन येथील श्रीनाथजी हवेली मंदिरचे अध्यक्ष हितेश हंशलिया, तसेच इर्विन हिंदू मंदिरचे सुरेश लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बालसंस्कार वर्गांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाल सेवेकर्‍यांना गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलेल्या अनेक सेवेकर्‍यांनी पुन्हा आनंदाने उपस्थित राहून स्वामींच्या कृपेने आमचे प्रश्न सुटले, समस्या मार्गी लागल्या, अडचणी दूर झाल्या असे अनुभव मांडले. गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले आणि छान आध्यात्मिक अनुभूती मिळाली याबद्दल सिएटल आणि लॉस एंजलिस येथील सेवेकर्‍यांनी आयोजकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!