Homeधार्मिकसेवामार्गातर्फे नाशिकमध्ये "तुलसी- दामोदर" विवाह अपूर्व उत्साहात साजरा!

सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये “तुलसी- दामोदर” विवाह अपूर्व उत्साहात साजरा!

– आरोग्य शिबीर आणि वधू-वर परिचय मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या सिडको महाकाली मैदानावर “तुलसी- दामोदर” विवाह सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात स्वामीनामाच्या जयघोषात पार पडला. या सोहळ्याला नाशिकमधील सेवेकर्‍यांची मोठी गर्दी उसळली होती.

सातपूर विभागातील सेवेकरी वर पक्षाकडून तर सिडको विभागातील सेवेकरी वधू पक्षाकडून वऱ्हाडी म्हणून आनंदाने सहभागी झाले होते. दत्तचौक केंद्रात वांड्निश्चय आणि हळदीचा कार्यक्रम गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. तर सायंकाळी अत्यंत चैतन्यदायी वातावरणात गोरज मुहूर्तावर तुलसी- दामोदर विवाह संपन्न झाला. यावेळी गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी “विवाह संस्था” या विषयावर मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सेवामार्गातर्फे कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.

वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

यानिमित्ताने सेवामार्गाच्या विवाह संस्कार विभागाने दिवसभर वधू-वर नोंदणी आणि वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात दोनशे उपवर मुला- मुलींनी विवाहासाठी नावनोंदणी केली तर दीडशेजणांनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. त्यापैकी शंभर तरुण-तरुणींना प्रत्यक्ष विवाहासंबंधी समुपदेशन करण्यात आले. तर सहा विवाह जुळण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू झाली. 

कमी खर्चात विवाह करा- गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे 

परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, सेवेकर्‍यांनी साखरपुड्यासारख्या छोट्या विधीत अल्पखर्चात विवाह करावेत. विनाकारण कर्ज काढून थाटामाटात लग्न करू नये. सेवामार्गातर्फे सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुला-मुलींचे विवाह मोफत करून दिले जातात. या उपक्रमात सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून दानशूर व्यक्तींनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार सीमाताई हिरे, महेश हिरे, योगिता हिरे, रश्मी हिरे, छाया देवांग, शीला भागवत, किरण गामणे, कावेरी घुगे, भाग्यश्री ढेमसे, सुमन सोनवणे, मनीषा गामणे, डॉ. वैभव महाले, रवी पाटील, अक्षय खांडरे, बाळा दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले. तर सेवामार्गाचे जिल्हा प्रतिनिधी घोडेराव काका यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असंख्य सेवेकर्‍यांनी विशेष योगदान दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!