पंचवटी । प्रतिनिधी
मुलींच्या मनपा शाळा क्र. १५ मखमलाबाद शाळेत शाळा स्तर क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सुनील बुनगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रुपाली प्रवीण मांडवी हिने सर्व खेळाडू आणि विद्यार्थिनींना क्रीडा शपथ दिली.
यावेळी शिक्षक पंकज पवार यांनी खेळाडूंना स्पर्धेच्या नियमांबाबत माहिती दिली. मोठया गटाच्या खो-खो खेळाच्या सलामीने खेळांच्या प्रात्यक्षिकास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री आथरे, संगीता पाटील, प्रतिभा वाटपाडे, कल्पना वाणी, सुरेखा कदम, अर्चना तिटकारे, राहुल चौधरी, प्रकाश बहिरम, किसन ठाकरे, पंकज पवार उपस्थित होते. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




















