Homeउत्तर महाराष्ट्रअंध विद्यार्थी वसती गृहासाठी ५० हजार लिटर पाण्याची टाकी; भूमिपूजन समारंभ संपन्न

अंध विद्यार्थी वसती गृहासाठी ५० हजार लिटर पाण्याची टाकी; भूमिपूजन समारंभ संपन्न

नाशिक – विशेष प्रतिनिधी
रिंग प्लस एक्वा लि. कडून प्राप्त सिएसआर निधीच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ नाशिक द्वारे अंध विद्यार्थी वसतिगृहासाठी ५० हजार लिटर पाण्याची टाकी बांधून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ रिंग प्लस एक्वा लि. चे कार्यकारी अधिकारी कमलाकर टाक यांच्या हस्ते व रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत व नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड च्या नाशिक जिल्ह्या शाखेच्या अध्यक्षा अॅड. विद्युल्लता तातेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी विद्युलता तातेड यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड संचलित अंध विद्यार्थी वसतिगृह व वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या देणगीतून साकार होत असलेला हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असून दिवाळीपूर्वी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश चंद्र सुराणा यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ नासिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी रोटरी करीत असलेल्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली आणि अशा समाजोयोगी प्रकल्पांच्या उभारणीसाठी रोटरी क्लब कायमच पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. रिंग प्लस एक्वा चे कमलाकर टाक यांनी रोटरीच्या माध्यमातून गेली पाच वर्षे सिएसआर देणगीतून विविध सामाजिक प्रकल्प उभे राहिले आहेत आणि रोटरीची विश्वासार्हता खूप मोठी असल्यामुळे कंपन्यांची उदार देणगी अशा प्रकल्पांसाठी प्राप्त होत असते अशी माहिती त्यांनी दिली. नॅबचे सचिव शितल सुराणा यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिक मानद सचिव शिल्पा पारख, प्रकल्प सचिव हेमराज राजपूत, उपाध्यक्ष विजय दिनानी, निर्वाचित अध्यक्ष गौरव सामनेरकर, विनायक देवधर, संजय अग्रवाल ,अमित पगारे, वैशाली रावत, निर्मलाबेन शहा, मोहनलाल लोढा, संगीताबेन शहा, एड कांतीलाल तातेड, राजेंद्र डूंगरवाल, डॉ. सायखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!