Homeक्राईमआडगाव पोलिसांचा २७ कि.मी. थरारक पाठलाग; सराईत चेन स्नॅचर जेरबंद

आडगाव पोलिसांचा २७ कि.मी. थरारक पाठलाग; सराईत चेन स्नॅचर जेरबंद

पंचवटी – विशेष प्रतिनिधी
आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथील सेल्फी पॉईंट जवळ चेन स्नॅचिंग करून पळून जाणाऱ्या
आंबिवली (कल्याण, ठाणे) येथील स्नॅचरला आडगाव पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. बळी मंदिर – राणेनगर – गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल – कामटवाडे – एक्लो पॉईंट असा तब्बल २७ किलोमीटर थरारक पाठलाग करून एकास पकडण्यात आले आहे. तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या पथकास ५० हजारांचे ‘रिवॉर्ड’ जाहीर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली हसत अफसर जाफरी (वय २५, रा. सुपर स्टार बेकरीचे मागे, पाटीलनगर, आंबिवली, कल्याण, ठाणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एन.एस. २०० मोटारसायकल, मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० गुन्हे दाखल आहेत.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, श्रीमती शोभा मुरलीधर नहिरे (वय ५५, रा. नांदूर लिंक रोड) या मंगळवारी दुपारी गणेश मार्केट चौकातून पतीसह भाजी घेऊन जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून हेल्मेट परिधान करून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. चेन स्नॅचर मंगळसूत्र खेचून जत्रा हॉटेलच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच सीआर मोबाईल वरील हवालदार निलेश काटकर, गुंबाडे यांनी ही माहिती
आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे हवालदार रावजी मगर, वाघचौरे यांना कळविले.
ते लागलीच बळीमंदिर येथे येऊन थांबले असता दोघे संशयित हे बळीमंदिर येथून उड्डाण पुलावर चढताना दिसले. तेव्हा चौघा पोलिसांनी एकाच वाहनातून त्यांचा पाठलाग सुरू केले.

दुचाकीवरील चोरटे वेगाने जात असतानाही पोलिसांनी बळी मंदिर – राणेनगर- गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल – कामटवाडे – एक्लो पॉईंट असा थरारक पाठलाग केला. अंबड औद्योगिक वसाहतीत गाडी रस्त्याचे बाजुला पार्क करुन अंगातील काळया रंगाचे जॅकीट काढले व हेल्मेट काढून पळू लागले. तेव्हा हवालदार निलेश काटकर, गुंबाडे, रावजी मगर, वाघचौरे यांनी त्यांचा पाठलाग करुन अली हसतला ताब्यात घेतले. मोबाईल व मोटारसायकलही पोलिसांच्या हाती लागली.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, सहायक निरीक्षक निखील बोंडे यांनी पोलीस पथकाच्या धाडसाचे कौतूक केले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या पथकास ५० हजारांचे ‘रिवॉर्ड’ जाहीर केले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!