Homeक्रीडापावसाने विश्रांती घेतल्याने विसर्जन मिरवणुकीतील उत्साह वाढला; शिवतांडव नृत्य ठरले आकर्षण

पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्जन मिरवणुकीतील उत्साह वाढला; शिवतांडव नृत्य ठरले आकर्षण

– पुढच्या वर्षी लवकर या….

नाशिक – विशेष प्रतिनिधी
दहा दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर आज अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला नाशिककरांतर्फे भावपूर्ण निरोप दिला जात आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत सकाळी ११ वाजता रिमझिम पावसात प्रारंभ झालेली शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूकीतील पहिले मंडळ सायंकाळी पाच वाजेदरम्यान रविवार पेठेत पोहचले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून मिरवणूक पहाण्यासाठी मार्गावर दुतर्फा नाशिककर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे.

जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून शनिवारी सकाळी ११ वाजता ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, गजानन शेलार, संजय चव्हाण, रामसिंग बावरी, समीर शेटे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीत २५ मंडळे सहभागी झाले आहेत. ना. महाजन यांनी स्वतः ढोलवादन करून मिरवणुकीचा आनंद लुटला.

माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा युवक मंडळाने चित्ररथासोबत पथकाने सादर केलेले शिवतांडव नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले आहे. यंदा मिरवणूक वेळेपूर्वी सुरू झाल्याने पंचवटीतील नागरिकांना पूर्ण मिरवणुकीचा आनंद अनुभवयास मिळणार आहे. 

गोदेची पातळी वाढली…नागरिकांची गर्दी

घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नाशिककरांनी गोदा काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सोमेश्वर, आनंदवली, हनुमान घाट, य.म. पटांगण, रामसेतू, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मंदिर परिसर, कन्नमवार पूल, तपोवन, दसक पंचक आदी भागात गोदावरी नदीत मुर्ती विसर्जन करण्यासाठी आबालवृद्धांची सकाळपासूनच गर्दी होती. सततच्या पावसामुळे तसेच गंगापूर धरणातून विसर्ग होत असल्यामुळे गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. विसर्जन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशामक दल, महापालिका व शहर पोलीस यांनी विशेष दक्षता घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!