Homeक्रीडाराज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा नाशिकमध्ये; २० सप्टेंबरला प्रारंभ

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा नाशिकमध्ये; २० सप्टेंबरला प्रारंभ

– नाशिक जिमखाना येथे आयोजन…

नासिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने राज्य अजिंक्यपद मानांकन टेबल टेनिस स्पर्धा २० ते २४ सप्टेंबर मधे होत आहे. या स्पर्धा नासिक जिमखाना येथे होणार असून या स्पर्धा  एकूण आठ टेबलावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धा पुरुष, महिला, मुले व मुलींच्या होणार असून एकूण १२ विविध वयोगटात होणार आहेत.

स्पर्धेत ११,१३,१५,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली तसेच पुरुष व महिला यांचा समावेश आहे. २०२४ मधे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने पाच सुवर्ण पदके मिळवित  महाराष्ट्राच्या टेबल टेनिस पटूंनी विविध गटाचे पाच राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. या पाच खेळाडूंचा सन्मान करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेने या वर्षीच्या होणाऱ्या पाच राज्य स्पर्धा या खेळाडूंच्या नावाने घेण्याचे ठरविले. त्यानुसार नाशिकच्या स्पर्धा ११ वर्षाखालील राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या नाशिकच्या केशिका पुरकर हिच्या नावाने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ७९३ प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेत प्रीसाईज टेबल्स व डबल फिश कंपनीचे बॉल्स वापरले जाणार आहेत. नासिक जिमखाना या स्पर्धेसाठी असलेली क्रीडा संकुले विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. 

या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यात नाशिकच्या १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे महाराष्ट्राची प्रथम मानांकन असणारी केशिका पूरकर, १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम मानांकित स्वरा करमरकर असलेल्या टेबल टेनिसपटूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून रोहित शिंदे तर उप प्रमुख पंच म्हणून गौरव फणसाळकर काम पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण १६ टेबल पंच म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आ. सीमाताई हिरे, आ. देवयानी फरांदे, नासिक जिमखाना, नामको बँक, विश्वास बँक, मुकुंद कुलकर्णी, रोशन खटोड, वैभव जोशी, आकाश मोदी आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०. १५ वाजता नासिक जिमखाना येथे, आमदार सौ. सीमाताई हिरे व आमदार सौ. देवयानी फरांदे यांच्या शुभहस्ते  होणार आहे. या प्रसंगी क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या  या स्पर्धेत कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष व चेअरमन समन्वयक कमिटी शेखर भंडारी, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, सुहास आगरकर, जय मोडक, पुनीत देसाई अजिंक्य शिंत्रे, राजा आहेर, धनंजय बर्वे, स्वाती आगरकर आदी प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!