Homeशहर व जिल्हा'नामियाचा घास' या बालनाट्याचे अभिवाचन उत्साहात संपन्न; नाट्य परिषदेतर्फे आयोजन

‘नामियाचा घास’ या बालनाट्याचे अभिवाचन उत्साहात संपन्न; नाट्य परिषदेतर्फे आयोजन

– संत नामदेवांच्या बालरूपाची उपस्थितांना अनुभूती…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्यावतीने शनिवारी (दि.२०) संध्याकाळी ६ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सभागृह, कालिदास कलामंदिर, येथे स्वप्ना प्रसाद लिखित, दिग्दर्शित ‘नामियाचा घास’ या बालनाट्याच्या अभिवाचन उत्साहात संपन्न झाले. संत नामदेव महाराज यांनी विठ्ठलाला भरविलेल्या घासाची गोष्ट या अभिवाचनातून मांडण्यात आली.

या प्रसंगी प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन सहसचिव विजय शिंगणे यांनी केले. अध्यक्ष प्रा.रविंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाट्य परिषदेच्या मासिक नाट्यअभिवाचन उपक्रमांतर्गत प्रथमच बालनाट्याच्या अभिवाचनाचे सादरीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“नामियाचा घास” या बालनाट्याच्या अभिवाचनात शुद्धेन भामरे, देवाशिष जगताप, आभास विंगळे, स्वरा कुलकर्णी, आदित्य कटारे, तनिष्क देशपांडे, त्रिशा गुळवे या ना.ए.सोसायटी संचलित रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले तर संगीत स्वप्ना प्रसाद आणि गौरांग अनसिंगकर यांनी दिले. संत नामदेव महाराज यांनी विठ्ठलाला भरविलेल्या घासाची गोष्ट या अभिवाचनातून मांडण्यात आली. समाजातून आणि बालविश्वातून ईश्वरभक्ती ही संकल्पना लोप पावत चालली आहे. संत परंपरेचा, पंढरीच्या वारीचा आणि विठ्ठलाच्या भक्तीचा देखील विसर पडतो आहे. हीच भक्ती, समर्पण समाजात रुजावे म्हणुन संतांचा अभ्यास मुलांकरवी व्हावा म्हणुन संत नामदेवांचे बालरूप या बालनाट्यात सांगितले गेले आहे. नामदेवांनी हट्ट धरला होता की विठ्ठलाने नैवेद्य खावा. अठ्ठावीस युगांचे विटेवर उभे राहणे सोडून त्यांनी तो स्विकार केला. गोणाई, दामाजी पंत, बाल जनी यांची विठ्ठलाप्रति असणारी भक्ती, श्रद्धा, आदरभाव याचे उत्कट वर्णन या बालनाट्यातून केले गेले आहे.

नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते सर्व बालकलाकार तथा लेखिका, दिग्दर्शिका यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर नाट्य परिषद, नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांचेसह ईश्वर जगताप, विजय रावळ, चंद्रकांत जाडकर, संजय भुजबळ, श्रीराम वाघमारे हे उपस्थित होते तर श्रीया जोशी, राजेश जाधव, विक्रम गवांदे हे कार्यकारिणी सदस्य सभागृहात हजर होते. सदर अभिवाचनास रंगुबाई जुन्नरे शाळेचे पालक शिक्षक संघ अध्यक्ष किरण शिंपी तसेच शालेय विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!