Homeशहर व जिल्हाकालिका व रेणुकादेवी यात्रा; वाहतुकीत मोठे फेरबदल

कालिका व रेणुकादेवी यात्रा; वाहतुकीत मोठे फेरबदल

– मंदिर परिसरातील मार्गावर वाहतूक बंद…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त नाशिक शहरातील जुना आग्रारोड वरील कालिकादेवी मंदिर भगूर येथील
रेणुकादेवी मंदिर येथे भरणारी यात्रा व दर्शनासाठी होणारी आबालवृद्ध भाविकांची गर्दी यापार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील वाहतुकीचे निर्बंध जारी करण्यात आले आहे. हे बदल २२ सप्टेंबर ते दोन अॉक्टोबर दरम्यान अंमलात असतील. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

कालिका मंदिर; वाहतुकीस प्रवेश बंद मार्ग….

– गडकरी सिग्नल ते हॉटेल रूची पावेतो जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर तसेच जोड रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

– चांडक सर्कल ते हॉटेल संदीप पावेतो जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर तसेच जोड रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

वरील मार्गावरुन जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारची मोटार वाहने, हातगाडया, बैलगाड्या, सायकल व इतर सर्व प्रकारची वाहने यांना वाहतुकीसाठी कालिकादेवी नवरात्रौत्सव यात्रा दरम्यान वरील मार्गावर पूर्णवेळ वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. या कालावधित सदर मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

वाहतुकीस पर्यायी मार्ग….

– गडकरी सिग्नल कडुन मुंबई नाक्याकडे किंवा गडकरी सिग्नल, चांडक सर्कल मार्गे इतरत्र जातील. जाणारी हलकी वाहने ही गडकरी सिग्नल सारडा सर्कल मार्गे जातील, एसएसके हॉटेल, सुयश हॉस्पिटल, टॅक्सी स्टॅण्ड, मुंबईनाका मार्गे जातील.

– भवानी सर्कल कडून सिबल फर्निचर मार्गे मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतुक ही भवानी सर्कल सिबल फर्निचर -तिडके कॉलनी रोड, नंदिनी नदी पुल, आर.डी. सर्कल, गोविंदनगर, इंदिरानगर जॉगींग ट्रॅक मार्गे इतरत्र जातील.

– चांडक सर्कल कडून संदीप हॉटेलकडे जाणारी हलकी वाहने चांडक सर्कल गडकरी सिग्नल सिंगाडा तलाव-सारडा सर्कल मार्गे इतरत्र जातील.

– सर्व एस.टी. बसेस, सिटीलिंक बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही मोडक चौक सिग्नल वरून खडकाळी सिग्नल मार्गे ६० फुटीरोडने व्दारका सर्कल या मार्गाने नाशिक रोड, सिडकोकडे व इतरत्र जातील व त्याच मार्गाने येतील

– तसेच मुंबई नाक्याहुन शहरात येणारी हलकी वाहने ही महामार्ग बसस्थानक टॅक्सी स्टॅन्ड, तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरुम समोरुन चांडक सर्कल, भवानी सर्कल या मार्गाने त्रंबक रोडने शहरात येतील.

– नाशिक शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारे जड व अवजड वाहने ही व्दारका सर्कल वरून गरवारे टी पॉईन्ट यामार्गाने सातपुर एमआयडीसी मध्ये जातील.

– व्दारका सर्कल वरुन पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पुल, संतोष टी पॉईन्ट, रासबिहारी हायस्कुल या मार्गाने पंचवटीत जातील.

– सारडा सर्कल कडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने ही शिंगाडा तलाव – बग्गा स्विटकडून उजवीकडे वळून एन.डी. पटेल रोड, किटकॕट कॉर्नर या मार्गाने मोडक सिग्नल मार्गे जातील.

– वाहनचालकांनी गर्दीचे ठिकाणे सोडून इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा.

भगूर रेणुकादेवी मंदीर; वाहतुकीस प्रवेश बंद मार्ग…

रेस्ट कॅम्प रोड, केंद्रीय विद्यालय ते जोशी हॉस्पिटल पावेतो मार्ग सर्वप्रकारची वाहने, हातगाड्‌या, बैलगाड्‌या, सायकल, एस.टी. बसेस, दुचाकी, वाहने यांना नवरात्र उत्सव कालावधीतील प्रत्येक दिवशी ‘प्रवेश बंद’ राहील.

वाहतुकीस पर्यायी मार्ग….

भगूर मार्गे देवळाली कॅम्प कडे व देवळाली कॅम्प मार्गे भगूर कडे जाणाऱ्या एस.टी. बसेस, रिक्षा व स्वयंचलित वाहने, इतर सर्व प्रकारची वाहने ही रेस्ट कॅम्प रोडवरील वाहतुकीसाठी जोशी हॉस्पिटल, स्नेहनगर, पेरूमल मार्ग, टेम्पल हिल रोड, जोझीला मार्ग, रेस्ट कँम्प रोडवरील सेंट्रल स्कुल यामार्गाने जातील व त्याच मार्गाने येतील.

भगूर मार्गे देवळाली कॅम्पकडे व देवळाली कॅम्प मार्गे भगूर कडे जाणाऱ्या एस.टी. बसेस, रिक्षा व स्वयंचलित वाहने, इतर सर्व प्रकारची वाहने ही भगुर नाका नं. २ येथून डावीकडे वळून मल्हारी बाबा नगर- बार्स स्कुल रोड, शिगवे बहुला, धोंडी रोड, खंडेराव टेकडी, डेअरी फार्म आनंद रोड, संसरी नाका यामार्गाने जातील व त्याच मार्गाने येतील.

– देवळाली कॅम्प मार्गे भगूर गावाकडे जाणारी जड व अवजड वाहने ही संसरी नाका येथून उजवीकडे वळून आनंद रोड, डेअरी फार्म, धोंडी रोड, शिगवे बहुला, बार्न्स स्कूल, भगुर नाका नं.-२ मार्गे येतील व जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!