Homeक्राईमधम्मनगर भद्रकाली येथील जातीय दंगलीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दीड वर्षापासूनचा फरारी...

धम्मनगर भद्रकाली येथील जातीय दंगलीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दीड वर्षापासूनचा फरारी अखेर जेरबंद

– गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
भद्रकालीतील धम्मनगर येथे दीड वर्षापूर्वी झालेल्या जातीय दंगलीत जीवे ठारा मारण्याचा प्रयत्न करणारा व तेव्हापासून फरारी असलेला अरफात अमिन पठाण (वय २१, राहणार घर नं. ३६५०, अमरधाम रोड, शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक) यास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास यश आले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, धम्मनगर येथे २०२४ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा, अॅट्रोसिटी यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. शहरामध्ये प्राणघातक शस्त्रे घेवून फिरणारे व दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे फरारी यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्या अनुषगांने उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.

युनिट एकचे पथक या फरारीचा शोध घेत असताना हवालदार प्रदीप म्हसदे व अंमलदार मुक्तार शेख यांना बातमी मिळाली की, फरारी अरफात पठाण हा शिवाजी चौक, कथडा या परीसरात फिरत आहे. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर तात्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार परिसरात सापळा रचला असता शिवाजी चौकातील खुशी मल्टीपरपज स्टोअर्स नावाचे दुकानासमोर तो शनिवारी मिळून आला. अधिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाजीमखान पठाण, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, मुक्तार शेख, सुकाम पवार यांनी ही कामगिरी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!