Homeक्राईमशेअर मार्केटमध्ये नुकसान; त्यांनी निवडला चेन स्नॅचिंगचा मार्ग

शेअर मार्केटमध्ये नुकसान; त्यांनी निवडला चेन स्नॅचिंगचा मार्ग

नाशिक – विशेष प्रतिनिधी
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पंचवटीतील रामवाडी परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. गुन्ह्याची कबुली देताना दोघा संशयितांनी शेअर मार्केटमधील फॉरेक्स व ट्रॅडींगमध्ये तोटा झाल्याने चेन स्नॅचिंगचा मार्ग निवडल्याचे सांगितल्याने पोलीसही अवाक झाले.

पंचवटीतील रामवाडी परिसरात ११ सप्टेंबरला ही घटना घडली होती. घरी परलेली महिला दरवाजा उघडून आतमध्ये जात असताना दोघेजण तिथे आले. त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेल्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

युनिट एकचे पथक या संदर्भातील समांतर तपास करत असताना हवालदार विशाल काठे व नाझिमखान पठाण यांना बातमीदार यांच्याकडून गुन्ह्यात सहभाग असलेले दोघेजण गुन्हयात वापरलेल्या त्यांचे सिल्वर रंगाच्या अॅक्सीस मोपेड (एमएच १५ डी. २४७१) वर उपनगर, जेलरोड भागात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रथमेश नितिन उशीर (वय २२, रा. फ्लॅट नं. ०४, निशिगंधा अपार्टमेंट, टाकळीरोड, शांतीपार्क, उपनगर), जोएल डेनियल म्हस्के (वय १९, रा. २०३, ओमकार हाईटस, परिजात नगर, विठठ्ठल मंगल कार्यालया जवळ, जेलरोड) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडुन गुन्हयात वापरलेली मोपेड अॅक्सेस मोटरसायकल तसेच चोरलेल्या सोन्याचे मंगळसूत्राची १,१०,०००/- रूपये किंमतीची १०.६५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकुण १,९०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, रमेश कोळी, नाजीमखान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, राम बर्डे, अनुजा येलवे, सुकाम पवार, समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील सहायक निरीक्षक जया तारडे, सुशील देशमुख यांनी ही कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!