पंचवटी । विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर रोडवरील तपोवन परिसरातील जेजुरकर लॉन्स मध्ये सोमवारी (दि. २२)रात्री बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कैद झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सामजिक कार्यकर्ते समाधान जेजुरकर केले आहे.

पंचवटी विभागातील तपोवनातील बराचसा भाग शेतमळे परिसर आहे. छत्रपती संभाजीनगर रोड जनार्दन स्वामी चौक चौफुली कडून टाकळी कडे जाणारा मार्गावर जेजुरकर मळा आहे. या मार्गाहून नागरिक जॉगिंग, शतपावली साठी जात असतात. या ठिकाणी जेजुरकर लॉन्स आहे, सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या लॉन्समध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजुरकर मळा परिसरात राहणारे नागरिक, तसेच या मार्गाहून मार्गक्रमण करणारे, दुचाकी चालक, शतपावली करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त समाधान जेजुरकर यांनी केले आहे.

























