ठाणे –
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी बचाव मोहिमेमुळे तब्बल वीस वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या राज व उद्धव या ठाकरे बंधूंमुळे मनसे व शिवसेना ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या घडामोडींसदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ठाकरे बंधू महापालिकेसाठी एकत्र आल्याची टीका केली होती. या टिकेले उत्तर देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी जाहीर पत्राद्वारे उत्तर दिले आहे. ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असे म्हणत विचारे यांनी ना. सरनाईक यांना आरसा दाखवला आहे.
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली खोचक टीका तसेच ना. शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून झालेल्या टीकेवरून ना. सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना माजी खा. राजन विचारे यांनी भले मोठे पत्र समाजमाध्यमावर टाकून ना. सरनाईक यांना जाब विचारला आहे. ते पत्र जसेच्या तसे…..




























