Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी

नाशिक – विशेष प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची पदोन्नती झाली असून त्यांची जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले. मित्तल यांच्या जागेवर कोण, हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सुपर फिफ्टी’ उपक्रम

मित्तल यांच्या संकल्पनेतून ‘सुपर फिफ्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश आदिवासी मुलींना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आदिवासी मुलींसाठी कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने १०० दिवसांच्या कार्यक्रमात चांगली कामगिरी केली, ज्यामध्ये कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीच्या गैरव्यवहारांवर कारवाई करत, चुकीचे नियोजन रोखले आहे. 

आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून, त्यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला आहे आणि आवश्यक बदल केले आहेत. तसेच, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांवर काम केले आहे. 

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे –

– अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर.

– अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर.

– श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी,जालना येथून जिल्हाधिकारी, ठाणे. या पदावर.

– विकास खारगे, भाप्रसे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,मंत्रालय, येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय,मुंबई या पदावर

– अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय येथून अपर मुख्य सचिव, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई या पदावर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!