– ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी भावेश शांतीलाल धाडीवाल यांना सायबर भामट्यांनी टेलिग्राम वरील ‘Amazone 8’ या ग्रुप मध्ये अॅड करून प्रॉडक्ट प्रमोशन केल्यास कॅश बॅक मिळेल, असे प्रलोभन दाखवून वेगवेगळे खात्यामध्ये एकूण १६ लाख ७८ हजार रूपये ट्रान्सफर करावयास लावले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी
‘गोल्डन अवर’ सायबर मदत संकल्पनेचा वापर करत त्यातील नऊ लाख ८० हजार रुपये गोठविण्यात यश आले असून न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम तक्रारदारास परत मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर फॉड झालेली रक्कम तात्काळ थांबविण्याकरीता गोल्डन अवर संकल्पना निर्माण करून अंमलात आणण्यात आली आहे. त्या अंतर्गत तक्रारदार श्री. भावेश शांतीलाल धाडीवाल (वय ३५, रा. पिंपळगाव बसवंत, ता निफाड) यांना १० अॉगस्ट रोजी सायबर गुन्हेगाराने टेलिग्राम वरील Amazone 8 जि या ग्रुप मध्ये अॅड करून प्रॉडक्ट प्रमोशन केल्यास कॅश बॅक मिळेल, )ॐ)असे प्रलोभन दाखवुन वेगवेगळे खात्यामध्ये एकुण १६,७८,००० /- रू ट्रान्सफर करावयास लावुन तक्रारदाराची आर्थिक फसवणुक केल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी लागलीच ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलीसांनी लागलीच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तक्रारदार यांची ऑनलाईन तकार नोंदवून घेतली. पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे तक्रारदार यांच्या फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ९,८०,००० हजार रक्कम लागलीच गोठविण्यात आली. ही रक्कम तक्रारदारास न्यायालयाच्या आदेशान्वये परत मिळवून दिली आहे. सायबर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, उपनिरीक्षक वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे, आकाश आंबोरे यांनी ही कामगिरी केली आहे.
नागरिकांना आवाहन :-
सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांचेव्दारे जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधीत बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी व लिंकविषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे. किंवा मनी लाँड्रींग अशाबाबत कोणताही फोन आल्यास विश्वास ठेवु नये Digital arrest बाबत Cyber police station किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा तसेच आपली गोपणीय माहीती (बँक खाते, ओटीपी) देवू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्ती, स्किम, गुंतवणुकीचे ऑनलाईन अॅप मध्ये जास्त परताव्याच्या आमिषापोटी गुंतवणूक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. अथवा सायबर हेल्प लाईन कमांक १९३०/१९४५ तसेच सायबर काईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तक्रार नोंदवावी.

























