Homeक्राईमद्वारका परिसरात 'एमडी' विक्रीसाठी आलेली टोळी जेरबंद; महिलेसह चौघांना अटक

द्वारका परिसरात ‘एमडी’ विक्रीसाठी आलेली टोळी जेरबंद; महिलेसह चौघांना अटक

– ३० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) सह १७ लाखांचा ऐवज हस्तगत… गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरात नवरात्रीचे मंगलमय वातावरण असताना द्वारका सारख्या गजबजलेल्या परिसरात एमडी अर्थात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेली टोळी गुन्हे शाखा युनिट एकच्या हाती लागली आहे. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. याटोळीकडून ३० ग्रॅम एमडी, चारचाकी वाहन, मोबाईल असा १७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुज्या उर्फ मुज्जफर मैनूद्दीन शेख (वय – ४३, रा. घर नं ३६७३, भोईवाडा कथडा, भद्रकाली), शेख फरहान रज्जा मोहमद सादिक (वय २२, रा. घर नं ३८०, बागवानपुरा, भद्रकाली), अनिल मोतीराम वर्मा (वय -३२, रा. श्रीमोती निवास, तपोवन, पंचवटी), हिना जीवन कापसे (वय ३५, रा. निलगीरी बाग) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबतचे अधिक वृत्त असे की, शहरात एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीपकुमार मिटके यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार युनिट एकचे पथक माहिती घेत असताना मुज्जु शेख हा साथीदारांसह व्दारका सर्कल येथील स्वागत हॉटेलमध्ये येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. तेव्हा मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी सापळा रचला. त्या सापळ्यात चौघेजण हाती लागले आहेत. त्यांच्याकडे ४.५ लाख रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज मिळून आले. तसेच चारचाकी वाहन व मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहे.

युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, किरण शिरसाठ, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, प्रदीप मसदे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, उत्तम पवार, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलींद परदेशी, शर्मिला कोकणी, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मनिषा सरोदे, नाजीम पठाण यांनी ही कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!